भारतीय बौद्ध महासभेचे एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न
भारतीय बौद्ध महासभेचे एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न
निलंगा, दि १८(मिलिंद कांबळे)
भारतीय बौद्ध महासभा शाखा निलंगाच्या वतीने निलंगा येथे एक दिवसीय कार्यकर्ता शिबिर दि.१७ रोजी संपन्न झाले.
येथील अशोकनगर बुद्धाश्रम वसतिगृहावर आयोजित केलेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ केंद्रीय शिक्षक आयु. ज्ञानोबा कांबळे गुरुजी व आयु. एम. एम. बलांडे गुरुजी उपस्थित होते.
या शिबिरास जिल्हाध्यक्ष प्रा. बापूसाहेब गायकवाड, उपाध्यक्ष प्रचार व पर्यटन विलास आल्टे, सचिव बौद्धचार्य डी. पी. भोसले, जिल्हा कार्यालय सचिव बौद्धचार्य हणमंत कांबळे, संस्कार उपाध्यक्ष आर.वाय. कांबळे, जिल्हा सचिव अशोक शिंदे, तालुका सचिव प्रेमनाथ कांबळे, लातूर शहर सचिव शत्रुघ्न भोसले, तालुका सचिव सूर्यकांत महाळंगिकर, तालुका संघटक दीपक कांबळे, लातूर तालुका सचिव आनंद डोनेराव, देवणी तालुकाध्यक्ष संजीव वाघमारे, शिरूर अनंतपाळ तालुका सरचिटणीस उमाकांत बानाटे उपस्थिती होते.
निलंगा शाखेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
या शिबिरास वरिष्ठ केंद्रीय शिक्षक ज्ञानोबा कांबळे गुरुजी,व एम.एम बलांडे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment