बौद्ध विहारातूनच सुसंस्कारित पिढी घडवावी -प्रा.राजा जगताप

विहारातून सुसंस्कारित पिढी घडवावी—प्रा.राजा जगताप

लातूर,दि.२४(मिलिंद कांबळे)

कोणत्याही बौद्ध  विहारात आकर्षक, आल्हाददायक प्रसन्न अशी सत्याचा मार्ग दाखवणारी बुध्दाची मुर्ती असते त्यामुळे शांतता मिळण्याचे एकमेव ठीकान हे बौद्ध विहारच  आहेत. विहारात  बसुनच सामाजिक विचारविनीमय झाले पाहिजे डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित "भगवान बुध्द आणि त्याचा धम्म" या ग्रंथाचे इतर ग्रंथा प्रमाणेच विद्यार्थ्यांनी विहारातूनच वाचन  केले पाहिजे असे मत प्रा.राजा जगताप यांनी व्यक्त केले.

 ते विक्रम नगर लातुर येथील श्रावस्ती बुध्द विहार ट्रस्ट आयोजित विहाराच्या १३व्या वर्षावास सांगता धम्ममोहत्सवात बोलत होते.

दि.२४ऑक्टोंबर २०२१ रोजी आयोजित केलेल्या दुस—या सञातील व्याख्यानात उस्मानाबाद येथील प्रा.राजा जगताप(गाव तेथे बुध्द विहार कादंबरीचे लेखक)यांनी केले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुध्द विहार ट्रस्टचे अध्यक्ष देविदास अचार्य होते.यावेळी प्रा.विलास कांबळे घारगावकर,आनंद डोनेराव,विनय कांबळे,मेजर दत्ताञ्यय शिंदे,रमेश सरवदे,भिमाशंकर बेंबळकर,कुसुमताई बनाटे,विजयाताई सरवदे,पद्मीनीताई साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी प्रमुख पाहुणे व वक्ते प्रा.राजा जगताप यांनी भगवान बुध्द व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पुजन केले यावेळी आनंद डोनेराव यांनी प्रा.जगताप यांचे स्वागत केले.

पुढे बोलताना प्रा.जगताप म्हणाले की,बुध्दाचा धम्म हा विज्ञाननिष्ठ असल्याने तो बाबासाहेबांनी आपल्याला दिला आहे तो आपण कृतीतून दाखवला पाहिजे बाबासाहेबांचा व रमाईचा त्याग आपण नेहमी आठवला पाहिजे.भविष्यातील आव्हाने ओळखून आपली पुढची पिढी सक्षम करण्यासाठी मुलांना चांगले शिक्षण दिले पाहिजे व शांततामय वातावरण असलेल्या विहारातून मुलांना वाचन करायला बसवले पाहिजे व अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी करायला लावली पाहिजे असे त्यांनी आवाहन केले

सूञसंचालन प्रा.विलास कांबळे यांनी केले या व्याख्यानासाठी विक्रम नगर,रामजीनगर व परीसरातील बौध्द उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..