वेदनेच्या पाऊलखुणा पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे निलंग्यात आयोजन...
वेदनेच्या पाऊलखूणा पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन
निलंगा,दि.२५ (मिलिंद कांबळे)
शतकानुशतके आठराविश्व दारिद्र्यात खितपत पडलेल्या वेशीच्या बाहेर गावाच्याही बाहेर जीवन जगणाऱ्या भटक्या समाजात जन्माला आलेले भटक्या समाजाच्या व्यथा प्रत्यक्षात आणि आता लेखणीच्या माध्यमातून वेशीवर टांगणारे लेखक कत्तीकार विलास माने लिखित वेदेनेच्या पाऊल खुणा या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष साहित्यिक डॉ. श्रीपालजी सबनिस,राज्यमंञी मा.ना.संजयजी बनसोडे ,मा. डॉ.ऋषीकेशजी कांबळे यांच्या हस्ते निलंगा शहरात प्रकाशन सोहळा पार पडणार आहे.
दिनांक २८ आक्टोबर२०२१ रोजी सकाळी ११ वाजता वृंदावन मंगल कार्यालय निलंगा येथे या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री उपराकारा लक्ष्मणजी माने राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून आ.विक्रमजी काळे,माजी खा.डॉ.सुनिलजी गायकवाड प्रा.सोमनाथ रोडे प्रा.कमलाकर कांबळे प्रदेश काँग्रेसचे सरचिटनिस अशोकराव पाटील-निलंगेकर शिवसेना नेते लिंबन महाराज रेशमे,जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, प्रा.श्रीकांत गायकवाड, प्रा.सुरेश वाघमारे, प्रकाश कांबळे,रावनराजे आत्राम प्रा.सुधीर अनवले, नारायण जावळीकर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून कार्यक्रमस्थळा पर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे.या ग्रंथ दिंडीत भटक्या विमुक्त जाती जमातीतील लोक आप,आपल्या पारंपारिक वेशभूषेत व्यवसायाचे प्रदर्शन करणार आहेत.
वेदनेच्या पाऊलखुणा या पुस्तकाचे लेखक विलासजी माने यांनी भटक्या विमुक्त संघटनेच्या माध्यमातून गेल्या अनेक दशकापासून सामाजिक चळवळीत व शैक्षणिक क्षेञात काम केले आहे. सामाजिक अन्याय अत्याचारा विरोधात व जनसामान्यासाठी मोठे आंदोलन उभे करून विविध समाज घटकांना न्याय मिळवून दिला आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली निलंगा शहरात शिक्षणापासून वंचित असलेल्या भटक्या जमातीतील मुला मुलींसाठी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा चालविले जाते.यापूर्वी लेखक विलास माने यानी कत्ती या पुस्तकाच्या माध्यमातून भटक्या जमातीमधील चालीरिती परंपरा अंधश्रध्दा त्या समाजाचा मागासलेपणा आपल्या लेखणीतून जगासमोर शब्दबद्ध केला आहे.
ग्रंथाली प्रकाशित कत्ती हे पुस्तक आज देशाच्या कानाकोप-यात पोहचले असून.महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठातून या पुस्तकावर अनेक विद्यार्थी प्रबंध तयार करीत आहेत.
वेदणेच्या पाऊलखूणा या पुस्तकाच्या माध्यमातून त्यानी भटक्या विमुक्त समाजातील विविध जाती समुहांचे प्रश्न व त्यांच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
Comments
Post a Comment