बहुजन समाजाने अन्याय अत्याचार सहन न करता प्रतिकार करावा

बहुजन समाजाने अन्याय अत्याचार सहन न करता प्रतिकार करावा...

- उपराकार लक्ष्मण माने

निलंगा,दि.२८

हजारो वर्षापासून प्रस्थापित समूहाकडून अन्याय,
अत्याचार,वेदना सहन करणाऱ्या बौद्ध,मातंग,भटके विमुक्त समाजातील लोकांनी आता अन्याय अत्याचार  सहन न करता जशास तसे उत्तर देऊन प्रतिकार करावा कारण आता प्रतिकार करण्याची  काळाची गरज असल्याचे मत उपराकार लक्ष्मण माने यांनी व्यक्त केले.

भटके विमुक्तांचे नेते तथा कत्तिकार विलास माने लिखित वेदनेच्या पाऊलखुणा पुस्तक प्रकाशनावेळी अध्यक्षस्थाना वरून ते बोलत होते.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते सर्वच  समाजसुधारकांच्या प्रतिमांचे दिपाने,धुपाने, पुष्पाने,पूजन करण्यात आले.

यावेळी साहित्यिक प्रा.डॉ.ऋषीकेश कांबळे, लातुरचे  माजी खासदार डॉ.सुनिल गायकवाड, प्रा.डॉ.श्रीकांत गायकवाड,प्रा.मधुकर सलगरे, लिंबन महाराज (रेशमे)पंडितराव धुमाळ,अजित माने,हरिभाऊ गायकवाड,नारायण जावळीकर, हमीद शेख, विनोद आर्य,विजयकुमार पाटील,ऑड.नारायण सोमवंशी,प्रल्हाद बाहेती,एम. एम. जाधव इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना माने पुढे म्हणाले की,भटक्या विमुक्यांच्या वाट्याला जे  दुःख, वेदना आल्या आहेत त्या  मोडीत काढण्यासाठी प्रस्थापित समाज व्यवस्थेकडे आता दया याचना न करता बहुजन समाजाने विद्रोह करण्याची काळाची गरज आहे. 

 बहुजनांनी आताआसूडासोबत हातात लेखनी घ्यावे तरच या समाजाला न्याय मिळेल. हिंदू धर्माच्या प्रस्थापित व्यवस्थेमुळे भटक्या विमुक्ताची कोंडी झाली आहे.या कोंडीला वाचा फोडण्याचे काम या वेदणेच्या पाऊलखुणा या पुस्तकातून कत्तीकार विलास माने यांनी शब्दबद्ध केले आहे.
 
यावेळी पुढे बोलतांना ते  म्हणाले की,जन आंदोलनाची  व लोक चळवळीची दखल न घेणारे केंद्रातील मोदी  सरकार हे देशद्रोही सरकार आहे. शेतकऱ्यांना चिरडून राज्य कराणारे हे सरकार आहे.अश्या शब्दात केंद्र सरकारवर त्यांनी तीव्र शब्दात टीका केली.यावेळी साहित्यिक प्रा.ऋषीकेश कांबळे म्हणाले की,भटक्या विमुक्त चळवळीला दलित संघटनानी बळ दिले पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकरानी स्व:ताला व समाजाच्या स्वाभिमानाला ठेच पोहचू न देता जो विचार मांडला आहे.तोच सिध्दांत समजून घेऊन काम करावे अज्ञान व अंधश्रद्धा हा भटक्या समाजाच्या विकासातील मुख्य अडथळा आहे.

यावेळी ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, या देशातील वंचित, दलित, भटक्या विमुक्त समाज हा आपल्या देशावर व देशाच्या मातीवर प्रेम करणारा देशभक्त समाज आहे.हा समाज  मातीशी नाळ ठेवून एकनिष्ठ जीवन जगणारा  समाज होय,स्व:ताच्या नावावर एक इंचही जागा नसताना देखील देशावर व देशातील माणसांवर , विविध जाती धर्मावर प्रेम करणारा राष्ट्रभक्त समाज आहे.

प्रस्थापितानी या समाजावर सातत्याने अन्याय अत्याचार केला आहे.त्यामुळे समाजात सामाजिक विषमता व दरी निर्माण झाली आहे.अशा समाजाच्या व्यथा व वेदना स्वतः भोगलेल्या कत्तीकार लेखक विलास माने यानी वेदनेच्या पाऊलखुणा या पुस्तकातून मांडल्या आहेत,हे स्वकथन नसून उपेक्षित व भटक्या विमुक्तांचे आत्मचरिञ आहे.यापुढील काळात मानवतेच्या व परीवर्तणाच्या चळवळीला हे पुस्तक दिशादर्शक असणार आहे.हे लेखन संकुचित विचारावर अवलंबून नसून ते सत्य कथनावर आधारित आत्मचरिञ आहे.अनेकवेळा अन्याय होऊनही प्रस्थापिताना कायम मान सन्मान देत जगण्याचा प्रयत्न करणारा हा समाज असून फक्त देश व भारतीय संस्कृती यासाठी धडपडणारी ही जात आहे.

प्रस्थापितांनी या समाजाला सोबत घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करावा, ईमानदारीच्या बळावर हा समाज कायम चांगले जगण्याचा प्रयत्न करतो. त्याला बळ देण्याची गरज आहे असे शेवटी सबनीस म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास सूर्यवंशी यांनी केले .तर सूत्रसंचालन सतीश हानेगावे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.दयानंद चोपणे,रजनीकांत कांबळे, शिवाजी जाधव,देवीदास धैर्य,भाऊसाहेब जाधव, दादाराव जाधव, दिगंबर सूर्यवंशी(नणंदकर)यांच्यासह अनेकांनी परिश्रम केले.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..