निलंगा नगरपालिका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार...

निलंगा नगरपालिका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार
            आयु.रेखाताई ठाकूर

 निलंगा,दि०४(मिलिंद कांबळे)

आगामी निलंगा नगरपालिकेची निवडणूक वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढविण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षा आयु.रेखाताई ठाकूर यांनी जाहीर केला.

दि.०३ ऑक्टोबर वार  रविवारी त्या निलंगा येथिल   येथील वंचित बहुजन आघाडीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन त्यांच्या हस्ते  करण्यात आले.यावेळी त्या बोलत होत्या.

तत्पूर्वी येथील छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या अश्वारूढ  पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्याच बरोबर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पुतळ्यास त्यांनी पुष्पहार अर्पण केला.

यावेळी मराठवाडा महासचिव रमेश गायकवाड, महिला जिल्हाध्यक्ष मंजुताई  निंबाळकर ,युवा जिल्हाध्यक्ष  युवराज जोगी ,महासचिव नितीन गायकवाड,चाकूर तालुकाध्यक्ष रामेश्वर हाके यांच्यासह पक्षाचे  जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलतांना ठाकूर म्हणाल्या की नगरपालिका ही कोण्या एका पक्षाची मक्तेदारी नाही. सत्ताधारी पक्षाने चांगला कारभार केला नाही. सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण, हेच जनतेला पाच वर्षे समजले नाही. जनतेच्या प्रश्नांवर विरोधी पक्षांनी कधी आवाज उठवला नाही. विरोधक सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याचे चित्र सातत्याने दिसत होते.'' 

"नागरिकांना त्यांच्यासाठी काम करणारे नगरसेवक हवे आहेत. त्यामुळे समाजहितासाठी कार्य करणारे  नगरसेवक जनतेने कल्पकतेने निवडून द्यावेत, यासाठी वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

या वेळी आमदार- खासदार विरुद्ध वंचित सामान्य जनता, असा लढा राहणार आहे,'' असेही  त्या म्हणाल्या. ओबीसी आरक्षणावर बोलतांना त्या म्हणाल्या की, भारतीय जनता पार्टी ही ओबीसी समाजाची फसवणूक करीत असून ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून ढोंग करीत आहे.

 न्यायालयात मात्र  ओबीसी आरक्षणासाठी ओबीसी समाजाचा इंम्प्यारिकल डाटा देण्यास स्पष्ट नकार देऊन ओबोसी समाजाची फसवणूक करून त्यांच्यावर अन्याय करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी व सामान्य कार्यकर्ते यांनी अथक  प्रयत्न केले.

निलंगा मिलिंद कांबळे
 मो.9960049411
 मो.8626000526

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..