सोन्यासाठी धारदार शस्त्राने गळा चिरून महिलेची हत्या

सोन्यासाठी धारदार शस्त्राने महिलेची गळा चिरून हत्या

निलंगा : प्रतिनिधी

 मौजे  गु-हाळ ता निलंगा जिल्हा लातुर  येथे आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सोन्यासाठी गळा चिरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेषाबाई मारूती दुधभाते वय ६५ वर्षे या आज बाहेर गावाहून येऊन आपल्या शेतात आल्या असता बाजूच्या शेतात दबा धरून बसलेल्या अज्ञात आरोपीनी सदरील महिलेच्या जवळ येऊन गळ्यातील सोन्याची बोरमाळ मंगळसुत्र व कानातील असे एकून चार तोळे सोने हिसका मारून काढून घेतले.महिलेने आरडाओरडा करताच आरोपीने त्याच्या हातातील लोखंडी सुरीने गळा चिरून महिलेची हत्या केली व  आरोपी तेथून  बाजूच्या तळीखेड रस्त्याने उसातून पळून गेला आहे. 

सदरील आरोपीस पकडण्यासाठी लातूर जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली असून सध्या परीसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून बाजूच्या शेतात काम करणारे शेतकरी धावून आले असता सदरील आरोपी पळून गेला आहे.प्रत्यक्षदर्शी पहाणा-यानी सदरील व्यक्तीच्या अंगावर काळा पँन्ट व पांढरा शर्ट होता असे सांगितले आहे.

निलंग्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे,पोलिस निरिक्षक बी.आर.शेजाळ यांनी  घटनास्थळाचा पंचनामा केला असून प्रेत शवविच्छेदनासाठी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..