केळगावच्या दलित वस्तीकडे महावितरणचे दुर्लक्ष...

केळगावच्या दलित वस्तीकडे महावितरणचे दुर्लक्ष 

आठ दिवसांपासून दलीतवस्ती  अंधारात 


निलंगा/प्रतिनिधी

मौजे केळगाव ता निलंगा जिल्हा लातुर  येथील दलित वस्तीमध्ये मागील  आठ ते दहा दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे दलित वस्तीमधील नागरिकांनी दिवाळी अंधारात साजरी करण्याची वेळ आली असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 

मागील आठ ते दहा दिवसापासून आण्णाभाऊ साठे नगर येथील भरत सुर्यवंशी यांच्या घरापासुन ते देविदास सुर्यवंशी  यांच्या घरापर्यंत  तर
 रमाई आंबेडकर नगर येथील डिगंबर कांबळे यांच्या घरापासुन ते धनाजी कांबळे यांच्या  घरापर्यंत विद्युतपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून खंडीत असून  येथील लाईनमन शेळके यांना येथील नागरीकांनी अनेक वेळा भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून खंडित असलेल्या  विजपुरवठा पुन्हा सुरू  करावा व तो  सुरळीत चालु  राहावा  अशी विनंती केली.

मात्र शेळके महाशय जनतेला  आरेरावीची भाषा वापरत आहेत. याबाबत महावितरणचे सहाय्यक अभिंयता शैलेश पाटील यांच्याशी संपर्क साधला आसता ते फक्त लाईनमन शेळके यांना दुरुस्ती करण्यास सांगतो असे दोन दिवसापासून सांगत आहेत.पंरतु सदरील लाईनमन  विद्युतपुरवठा काही केल्याने सुरळीत करीत नाहीत त्यामुळे या भागातील नागरिकांना ऐन सणासुधीच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी, विचार  अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..