जेष्ठ समाजसेवक एन.आर.स्वामी यांना साश्रु नयनांनी दिला अखेरचा निरोप
जेष्ठ समाजसेवक एन. आर.स्वामी यांना दिला साश्रु नयनांनी अखेरचा निरोप
निलंगा,दि.२१(मिलिंद कांबळे)
येथील जेष्ठ समाजसेवक , सेवानिवृत्त नायब तहसीलदार तथा माहिती अधिकार कार्यकर्ते एन.आर. स्वामी यांचं दि.२१ नोव्हेंबर २०२१ रविवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते ८२ वर्षाचे होते.
त्यांनी मागील अनेक वर्षांपासून माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून काम केले आहे. माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातुन त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या व अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणा विरोधात लढा देऊन हवेत वावरणाऱ्या लोकांना जमिनीवर आणण्याचे काम केले.त्याचप्रमाणे माहिती अधिकार कायद्याच्या साहाय्याने हजारो सार्वसामान्य लोकांना त्यांनी न्याय मिळवून देण्याचे महान कार्यही त्यांनी केले आहे.थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या विचारांचे ते पाईक होते.
त्यांच्या पार्थिव देहावर आज दि.२१रोजी दुपारी ०३ वाजता त्यांच्या स्वतःच्या शेतात अंतीमसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या शेकडो चाहत्यांनी व कार्यकर्त्यानी साश्रु नयनांनी अखेरचा निरोप दिला. त्यांच्या पश्चात्त्य दोन मुले,दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे. ते जरी आज शरीराने आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हजारो लोकांच्या हृदयात कायम कायम आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे कायम चालू ठेवणार असल्याचे मनोदय अनेकांनी यावेळी व्यक्त केले.
मिलिंद कांबळे, निलंगा
मो 9960049411
Comments
Post a Comment