निलंगा येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद स्थापना दिन उत्साहात साजरा..
निलंगा येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद स्थापना दिन उत्साहात साजरा
निलंगा,दि.०४(श्याम मुळजकर)
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद स्थापन दिन (वर्धापन दिन)अत्यंत उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कासारसिरसी येथील जेष्ठ पत्रकार श्याम मुळजकर हे होते.
तत्पूर्वी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद स्थापना दिन अर्थात (वर्धापन दिन) कासारसिरसी येथील ज्येष्ठ पत्रकार श्याम मुळजकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून केक कापून साजरा करण्यात आला.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची स्थापना दिनांक ०३ डिसेंबर १९३८ साली करण्यात आली. या स्थापनेस ८३ वर्षे पूर्ण झाले त्याची औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला.निलंगा येथील सा.नगरीचा वैभवचे संपादक मोहन क्षिरसागर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे पत्रकारांच्या माध्यमातून अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निटूरचेच नव्हे तर लातुर जिल्ह्याचे सदाबहार पत्रकार राजकुमारजी सोनी (भाऊ) यांनी त्यांच्या सदाबहार शैलीत प्रास्ताविक केले. आपल्या समारोपपर भाषणात जेष्ठ पत्रकार मुळजकर म्हणाले की, या पत्रकार संघटनेच्या स्थापनेची परंपरा मागील ८३वर्षांपासून आपण जोपासली आहे.म्हणूनच आज पत्रकारितेने हा कळस बांधला आहे. आपणही यापुढे दैदीप्यमान परंपरा जोपासली आहे. या परंपरांचा मला अभिमान आहे ही परंपरा आपण सर्वांनी अखंडित चालवावी असे प्रतिपादन त्यांनी केले.यावेळी ते पुढे म्हणाले की, ग्रामीण पत्रकारांना सक्षम बनवण्यासाठी असे विविध उपक्रम तालुका अंतर्गत गावात राबवावेत जेणेकरून ग्रामीण भागातला पत्रकार आत्मनिर्भर बनेल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमास तालुक्यातून सर्वस्वी सौ.मिनाक्षी क्षीरसागर,जेष्ठ पत्रकार सुभाष नाईक,मोहन क्षिरसागर, हरिभाऊ सगरे, किशोर सोनकांबळे, मिलिंद कांबळे, विशाल हलकीकर, संतोष डांगे, रविकिरण सूर्यवंशी, बालाजी कांबळे गोविंद सूरवसे, माधव शिंदे प्रशांत साळुंके नामदेव तेलंगे, किशन शिंदे, महावीर काकडे, महेश गरंडे, रमेश लांबोटे, मुन्ना सुरवसे, रमेश शिंदे,जावेद मुजावर यांच्यासह बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.
Comments
Post a Comment