निलंगा तालुक्यातील अवैध गुटखा वाहतूक व विक्रीवर कारवाई करण्याची मागणी...

निलंगा तालुक्यातील अवैध गुटखा  वाहतूक व विक्रीवर कारवाई करण्याची मागणी 

निलंगा, दि१०(डिसेंबर२०२१)
 
निलंगा  तालुका व शहरातील अवैध गुटखा वाहतूक आणि विक्री तत्काळ थांबविण्यात यावी. शहरात येणारा गुटखा रोखण्यासाठी तालुक्यातील सीमेवरील व शहरातील सीमेवरील  तपासणी अत्यंत कडक करण्यात यावी व अवैध गुटखा विक्रेत्यांवर भा.द.वी कलम १८८ व ३२८ प्रमाणे गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने  निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

याबाबत निलंग्याच्या  उपविभागीय अधिकारी श्रीमती शोभा जाधव  व निलंग्याचे उप -विभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिनेशकुमार कोल्हे  यांना दिलेल्या निवेदनात तालुका अध्यक्ष देवदत्त सूर्यवंशी निलंगेकर यांनी म्हटले आहे. की,शाळा, महाविद्यालय परिसरात व गल्ली बोळात ,व सार्वजनिक ठिकाणी सर्रास गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुपारी, खर्रा, मावा सारख्या पदार्थांची विक्री केली जात आहे. यामुळे शालेय विद्यार्थी आणि तरुण पिढीच्या जीवन मरणाचा  प्रश्न उपस्थित होत आहे. 

निलंगा शहरात येणारा गुटखा रोखण्यासाठी शहराच्या सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी याचबरोबर अन्न व औषध प्रशासन विभाग, नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांनी  एक ठोस कार्यक्रम हाती घ्यावा. जेणेकरून निलंगा शहरातील व तालुक्यातील गुटखा वाहतूक व विक्रीचा पूर्णपणे बिमोड होईल. याबाबतीत योग्य ती कारवाई नाही  झाल्यास मानव कल्याणासाठी   रस्त्यावर उतरून  संघर्ष करण्यात येईल असा इशाराही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर तालुका अध्यक्ष  देवदत्त सूर्यवंशी निलंगेकर शहर अध्यक्ष आमेरभाई  सय्यद पाटे- वाले शहर उपाध्यक्ष जमीर शेख,शहर संघटक वाहेद कुरेशी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहरअध्यक्ष धम्मानंद काळे,भिम शक्तीचे मुन्ना सुरवसे,अरबाज शेख,मुनिर शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..