निलंगा येथे तांत्रिक विज कामगार संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

निलंगा येथे तांत्रिक विज कामगार संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

निलंगा, दि.११

महाराष्ट्र राज्य विज तांत्रिक कामगार कामगार संघटनेचा  २४ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. येथील विभागीय कार्यालयात दि.११ रोजी लातुर झोन सर्कल अंतर्गत निलंगा येथील बहुसंख्य तांत्रिक कर्मचारी सभासद यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी संघटनेचे वार्ताफलक १७०१ चे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव परमेश्वर सोपानराव सूर्यवंशी यांनी केले. यावेळी विभागीय कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता कत्ते एच आर व्यवस्थापक मेथेवाड,संघटनेचे कोषाध्यक्ष अतुल वाडीकर,संघटक रानबा आमले, उपाध्यक्ष व्यंकट शिंदे, अमोल माने,अभय धुमाळ,
परमेश्वर पवळे, विज कर्मचारी सह.पतसंस्था निलंगा चे व्यवस्थापाक अंजीर गायकवाड यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी वअनेक सभासद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे सचिव पी एस सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..