शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी आवाहन
निलंगा, दि१२(मिलिंद कांबळे)
निलंगा तालुका व परिसरातील सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की, मागासवर्गीय मुलामुलींचे शासकीय वसतिगृह निलंगा ता निलंगा जिल्हा लातूर या वसतिगृहात ई.स २०२१- २०२२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देणे चालू झाले आहे.
या वसतिगृहात इयत्ता आठवी ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत जेवण शैक्षणिक साहित्य रक्कम गणवेश रक्कम प्रत्येक महिन्याला निर्वाह भत्ता रक्कम दिली जाते .तालुक्यातील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यानी वसतिगृहात प्रवेश घ्यावा प्रवेशाची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२१ आहे.
असे अहवान वसतिगृहाचे अधीक्षक दीपक जाधव यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क 9404272774
Comments
Post a Comment