कु.ज्योती पोस्ते पोटनिवडणुकीत बहुमताने विजयी.
कु.ज्योती पोस्ते बहुमताने विजयी
निलंगा,दि.२३
मौजे माळेगाव (क) ता निलंगा जिल्हा लातुर येथिल ग्रामपंचायतीची पोटनिवडूनक पार पडली.
या पोटनिवडणूकीत माजी सरपंच भिम पोस्ते यांची पुतनी कु.ज्योती सुधीर पोस्ते या बहुमतानी विजयी झाल्या आहेत.मागील वर्षी काही महिन्यापूर्वी ग्रामपंचायत निवडणूक होवून भिम रघुनाथराव पोस्ते हे बिनविरोध निवडून आले होते.
मात्र तिसरे अपत्य असल्या कारणाने ते अपात्र झाल्यामुळे पोटनिवडणूक लागली होती.सरपंचपदास अपात्र करण्यांत त्यांचेच बंधू दत्तात्रय लक्ष्मणराव पोस्ते यांचा मोठा वाटा होता.
मात्र पुन्हा एकदा दत्तात्रय पोस्ते यांनी पोट- निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत तीन उमेदवारापैकी ते तिस-या क्रमांकावर येवून 103 मत घेतले. तर दुसरे माजी सैनिक मिलिंद पुंडलिक उघाडे यांना 133 मते मिळाली तर विजयी उमेदवार कु. ज्योती सुधीर पोस्ते यांनी 203 मते घेवून विजयी झाल्या आहेत. माजी सरपंच श्री भिम पोस्ते हे जनतेच्या मनातील सरपंच असल्याने पुन्हा एकदा जनतेनी त्यांच्याच पुतणीला निवडून देण्यात आले. या निवडी बद्दल - बबुवान किशनराव शिंदे, विश्वनाथराव दिगंबर कोळसुरे (कु·म. संघटना संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र) अनंत जाधव, तानाजी कोळसुरे, श्रीनिवास वाघमारे, बालाजी पाटील,भिम पोस्ते, बालाजी पोस्ते, अशोक बामदे ,शिवाजी खलुले, अनंत खलुले , व्यंकट शिंगारे, दत्ता विणकर ,संदिप नाघमोडे आणी गावकऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
Comments
Post a Comment