मानेजवळगा ग्रामपंचायतीचे ग्रामस्थांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष
मानेजवळगा ग्रामपंचायतिचे ग्रामस्थांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष
ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात असल्याचा आरोप ?
निलंगा, दि.२५(मिलिंद कांबळे)
मौजे मानेजवळगा ता निलंगा जिल्हा लातुर येथील ग्रामपंचायतिच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र सद्या पहावयास मिळत आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, तालुक्यातील मानेजवळगा गावात रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासन मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार इथल्या गावकऱ्यांनी केली आहे.
मानेजवळगा गावामध्ये मूलभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे.
या सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत आहे. गावांमध्ये बहुतांश रस्त्यांचे बांधकाम झालेले नसल्याने गटारं देखील बांधण्यात आलेली नाहीत.जे गटार बांधले आहेत त्यातून सांडपाणी गटारीतून सोडले जात नाही. त्यामुळे गावातील संपूर्ण सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे.तर काही नागरिकांनी सांडपाण्यासाठी असलेले शोषखड्डे देखील बुजवून घेतल्याने हे संपूर्ण सांडपाणी रस्त्यावर तुंबल्याने सर्वदूर गटारे साचली आहेत, असा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे. या साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. सोबतच दुर्गंधीमुळे देखील नागरिक बेजार झाले आहेत. शिवाय काही नागरिक दवाखान्यात उपचार घेत आहेत .आधीच कोरोनामुळे भीतीचे वातावरण आहे, तर आता डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव होत असल्याने घाणीचे साम्राज्या परसल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
Comments
Post a Comment