अंबुलगा (वि) ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत म.वि.आ.चा विजय

अंबुलगा( वि) ग्रामपंचायत पोट निवडणुकीत म.वि.आ चा विजय

निलंगा,दि.२३

नुकत्याच पार पडलेल्या अंबुलगा(वि)ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत म.वि.आ च्या उमेदवाराने बाजी मारली असून तीन रिक्त पदासाठी झालेल्या निवडणुकीत
भाजपाच्या तिन्ही उमेदवाराचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला आहे.
यात प्रभाग क्रमांक १ मधून भाजपा चे प्रकाश नारंगवाडे यांना १३७ मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय भीमराव सोनकांबळे यांना १४८मते मिळाली संजय सोनकांबळे हे ११मताच्या फरकाने विजयी झाले.तर प्रभाग क्रमांक १ सर्वसाधारण महिला पैकी भाजपाच्या शिवनंदा कांबळे यांना ११२मते मिळाली तर शिवसेनेच्या   प्रभावती मुगळे यांना १७२ मते  मिळाली त्या ६० मताच्या फरकाने विजयी झाल्या.प्रभाग क्रमांक ३ मधून अनुसूचित जाती महिला पैकी भाजपच्या मोहराबाई अरविंद मन्नाडे यांना ११४ मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली कांबळे यांना १२९ मते मिळाली.त्या १५मताच्या फरकाने विजयी झाल्या.
      चार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपा प्रणित पॅनल ने ०९पैकी०९ सर्व जागा जिंकून बहुमताने ग्रामपंचायत ताब्यात घेतली होती.मात्र यातील तीन सदस्य अपात्र झाल्याने नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत म.विआच्या तिनही उमेदवाराने विजय मिळविल्याने मविआच्या  ग्रामविकास काशी विश्वनाथ पॅनल कडून आता यापुढे गावाच्या विकासाकरिता प्रयत्न करणार असल्याचे संजय जयपाल पाटील व राहुल गुलाबराव मुगळे या दोन तरुण कार्यकर्त्यांनी निश्चय केला असून गेल्या चार वर्षांपासून बंद असलेली वाटर फिल्टर पाणी पुरवठा  योजना चालू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

त्याचप्रमाणे नालसाब पीरच्या जागेत केलेले सरपंचाचे अतिक्रमण काढण्यासाठी सरकारकडे मागणी केली जाईल शिवाय कोविड निधीचा व १५व्या वित्त आयोगाच्या  निधीत झालेला भ्रष्टाचार व शौचालय  निधीत झालेला अपहार उघड करून संमधिताकडे कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करून झालेल्या अपहार बद्दल प्रकरण उघडकीस आणले जाईल .सिद्धप्पा मंदिराची झालेल्या देणगीचा निधी कोण हडप केला आहे.याचा छडा लावला जाईल ग्रामरोजगार सेवक पदाची चुकीची नियुक्ती करून चुकीच्या पद्धतीने मानधन काढण्यात आले. याचबरोबर मागील ४ वर्षात झालेल्या अनागोंदी, गैरव्यवहार झालेल्या बाबतीत योग्य चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही पॅनल प्रमुख यांनी सांगितले.या विजयी झालेल्या मविआ च्या उमेदवाराचा सत्कार काँग्रेसचे नेते तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती माधवराव पौळ यांनी त्यांच्या निवासस्थानी शाल श्रीफळ देऊन योथोचित सत्कार केला.
यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तत्पूर्वी गावात विजयी मिरवणूक काढण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..