बौद्ध बांधवांनी धम्मयान दिनदर्शिकाच खरेदी करावी: रोहित बनसोडे
बौद्ध बांधवांनी धम्मयान दिनदर्शिकाच खरेदी करावी
निलंगा,दि.१४
बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक धर्माचा अभ्यास करून अथक प्रयत्नाने आपल्याला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे धम्म दिक्षा घेऊन व लाखो अनुयायांना धम्मदिक्षा देऊन विज्ञानवादी धम्म स्वीकारला त्यामुळे आपल्या समाजाची प्रगती झालेली दिसून येत आहे.म्हणून प्रत्येक बौद्ध कुटुंबानी धम्मयान दिनदर्शिकेचा वापर करून अनिष्ठ रूढी परंपरेचा त्याग करावा व विज्ञानवादी धम्माचे आचरण करावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष रोहित बनसोडे यांनी केले आहे.
ते निलंगा शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने रिपाइं(डे)चे प्रदेश सरचिटणीस विलास सूर्यवंशी जेष्ठ पत्रकार मोहन क्षिरसागर, गणराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष रामलिंग पटसाळगे,दिपक जाधव यांच्यासह अनेकांना धम्मयान दिनदर्शिका भेट देण्यात आल्या यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाउपाध्यक्ष आर वाय कांबळे, शासकीय वस्तीगृहाचे अधिक्षक दिपक जाधव,नवनाथ गायकवाड पत्रकार मिलिंद कांबळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बनसोडे पुढे म्हणाले की, भगवान बुद्ध, सम्राट अशोक, राजा मिलिंद, पूज्य भंते नागसेन ,अशा जागतिक स्तरावर आपल्या विचारांचा ठसा उमटवलेल्या आदर्श महापुरुषांचा अभ्यास करून ,या भारत देशामध्ये, या भारत देशातील मूलनिवासी असलेल्या सर्व भारतीयांना पुन्हा एकदा बुद्ध, सम्राट अशोक, राजा मिलिंद ,पूज्य भंते नागसेन अशा महान आदर्श महापुरुषांचा वैचारिक वारसा मिळाला पाहिजे म्हणून ,भारत देशामध्ये धम्माची क्रांतिकारक आणि निर्णायक अशी भूमिका घेऊन बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराच्या पूर्वीच अर्थात 14 ऑक्टोबर 1956 च्या पूर्वीच बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली.
भारतीय बौद्ध महासभेचे पहिले अध्यक्ष स्वतः परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र आदरणीय पूजनीय यशवंतराव भिमराव आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष होते .त्यानंतर गेल्या चौरे चाळीस वर्षापासून आदरणीय महाउपासिका ममता सागर मीराताई आंबेडकर या भारतीय बौद्ध महासभेच्या तृतीय राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यासोबत आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत
आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय बौद्ध महासभा बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श विचार प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचा आदर्श प्रयत्न सातत्याने करत आहेत.या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून पूर्ण भारत देशामध्ये आणि जगामध्ये बुद्धाचा धम्म, सदधम्म प्रसारित करण्यासाठी या संस्थेची स्थापना बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली.
त्या अनुषंगाने बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बुद्ध धम्म आणि संघ त्यासोबत चक्रवर्ती राजा सम्राट अशोक ,राजा मिलिंद, पूज्य भंते नागसेन या सर्व आदर्श महापुरुषांच्या विचारांचा वारसा चालवण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय कार्यकारणी पासून ते ग्राम शाखेच्या कार्यकारणी पर्यंत एक सुंदर अशा प्रकारची रचना बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. या रचनेमध्ये भारतीय बौद्ध महासभेचा पदाधिकारी तथा कार्यकर्ता हा विद्यासंपन्न ,मती संपन्न ,नीती संपन्न ,गती संपन्न ,शील संपन्न ,बनण्यासाठी भगवान बुद्धाच्या अष्टांगिक मार्गाचा आणि सील मार्गाचा अभ्यास होण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी, अभ्यास करून शील संपन्न झालेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्याला भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून केंद्रीय शाखेपासून ग्राम शाखे पर्यंत अर्थात शहरापासून खेड्यापर्यंत आणि खेड्यापासून शहरापर्यंत बुद्धिष्ट संस्कृती विकसित करता यावी म्हणून आणि या भारत देशाला जगाच्या पाठीवरती पुन्हा एकदा बुद्धाचा देश म्हणून उत्कृष्ट ओळख निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अर्थात 24 प्रकारचे कार्य बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले आहेत .आजच्या या आधुनिक युगामध्ये बुद्धिष्ट बुद्धिष्ट संस्कृतीला विकसित करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्मयान दिनदर्शिका दरवर्षी केंद्रीय कार्यकारणी ते ग्राम कार्यकारणी पर्यंत सर्व बौद्ध लोकांना वितरीत केली जाते .
संपूर्ण बारा महिने ,365 दिवस, बारा पौर्णिमा बौद्धांचे सण , उपोसथ आणि बुद्ध, राजा चक्रवर्ती सम्राट अशोक, राजा मिलिंद, पूज्य भंते नागसेन ,क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पेरियार स्वामी ,संत गाडगेबाबा , माता सावित्रीमाई फुले ,माता रमाई ,माता यशोधरा ,राजपुत्र महेंद्र ,राजकन्या संघमित्राअशा अनेक महापुरुषांच्या विशेष तारखा दिवस त्यांनी केलेले कार्य, त्यांनी भारतीयांना केलेला उपदेश या सर्व घडामोडी ठळक पद्धतीने तारीख वाईज महिना वर्ष या पद्धतीने भारतीय बौद्ध महासभा यांनी निर्माण केलेल्या तयार केलेल्या धम्मयान या दिनदर्शिके मध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे .तेव्हा सर्व बौद्ध बांधवांनी भारतीय बौद्ध महासभा यांनी निर्माण केलेली धम्मयान दिनदर्शिका प्रत्येकाच्या घरामध्ये कार्यालयामध्ये दर्शनी भागामध्ये लावावी आणि चालता बोलता महापुरुषांच्या जीवनामध्ये घडलेल्या सर्व घडामोडींचा अभ्यास सहजरित्या करून आपल्या जीवनामध्ये प्रेरणा मिळवून एक आदर्श बौध्द होण्यासाठी धम्मयान दिनदर्शिका अत्यंत उपयुक्त आहे. तेव्हा प्रत्येकाने भारतीय बौद्ध महासभेचे तालुका पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभेचे शहर पदाधिकारी अर्थात तालुका शाखा ,शहर शाखा, आणि ग्राम शाखा यांच्याकडून ही दिनदर्शिका प्राप्त करून भारतीय बौद्ध महासभेला सहकार्य करावे अर्थात परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रसारित करण्यासाठी सहकार्य करावे ही नम्र विनंती इतर कसल्याही प्रकारचे व इतर कोणत्याही प्रकारच्या दिनदर्शिका खरेदी करून आपण कमवलेला पैसा व्यर्थ खर्च करू नये असे आपणास नम्र आव्हान आणि विनंती.
ही दिनदर्शिका आजच खरेदी करावी त्याकरिता भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार उपाध्यक्ष आर वाय कांबळे सर भारतीय बौद्ध महासभेचे तालुका संस्कार उपाध्यक्ष सातपुते सर किंवा भारतीय बौद्ध महासभेचे शहर शाखा अध्यक्ष एडवोकेट सुलक्षण धैर्य ,भारतीय बौद्ध महासभेचे शहर शाखा सरचिटणीस एडवोकेट धनराज धैर्य भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार सचिव इंद्रजीत कांबळे सर ,एडवोकेट विशाल गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा .
Comments
Post a Comment