निलंगा तालुक्यातील हत्तरगा(हा)येथे कोरेगाव भिमा येथील शूरवीरांना मानवंदना

निलंगा तालुक्यातील हत्तरगा (हा) येथे कोरेगाव भीमा येथील  शूरवीरांना मानवंदना

 निलंगा, दि०१


मौजे हत्तरगा (हा) ता निलंगा जिल्हा लातुर येथे भिमा कोरेगाव शौर्यदिनी शुरवीरांना  मानवंदना देण्याचा कार्यक्रम येथील समाज बांधवांच्या वतीने महाबोधी बुद्धविहार हत्तरगा(हा)येथे आयोजीत करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत माळी हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष प्रा.रोहित बनसोडे होते.

यावेळी लहुजी सेनेचे मराठ- वाडा कार्याध्यक्ष गोविंद सूर्यवंशी,वंचितचे युवा जिल्हा- ध्यक्ष युवराज जोगी,गणराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष रामलिंग पटसाळगे,पत्रकार मिलिंद कांबळे, गणराज्यचे दत्ता कांबळे यांची विशेष उपस्थिती होती.

तत्पूर्वी तथागत गौतम बौद्ध,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भीमा कोरेगाव येथील विजयी स्तंभाच्या प्रतिकृतीचे दिपाने,धुपाने,पुष्पाने ,पूजन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी भीमा कोरेगाव शौर्य दिनावर प्रकाश टाकला.

हा शौर्य दिन साजरा करण्यासाठी,आंबेडकरी अनुयायी तथा बौद्ध बांधवांना दोन वर्षापासून बंधने आल्याने हा दिवस अत्यंत साध्या पद्ध- तीने साजरा करण्यात आला. 

या वर्षी मात्र हा कार्यक्रम  साजरा करून समस्त आंबेडकरी अनुयायांनी आपला आनंद द्विगुणित केला.

भीमा-कोरेगाव शौर्यदिनाचा मुख्य सोहळा, पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा  येथे एक जानेवारी रोजी लाखोचा भीमसागर  मानवंदना देण्यासाठी आपल्या महार रेजिमेंट शूरवीरांना सलामी देण्यासाठी येत असतात.

दिनांक १ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगावच्या पाचशे महार  सैनिकांनी पेशवाईंचा नायनाट केला. झाडू, मडक्याच्या बंधनातून मुक्त केले.या भीमा कोरेगावच्या शौर्यदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक वर्षी  न चुकता या शुरविरांना मानवंदनेसाठी भीमा कोरेगावला उपस्थित रहायचे. 

त्यांच्या उदात्त उद्दिष्ट पूर्तीसाठी 
येथील समाजबांधवांच्या वतीने  भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सरपंच प्रकाश इंगळे,पंडित फुलसुरे,युवा कार्यकर्ते अमोल पाटील,विश्वनाथ इंगळे,बाळासाहेब गायकवाड,उद्धव कांबळे,भीमज्योति उन्नती मंडळाचे युवा कार्यकर्ते दत्ता कांबळे,विशाल कांबळे,संजीव कांबळे,प्रकाश कांबळे,मारुती कांबळे,मोहन कांबळे,शुभम कांबळे,शंकर कांबळे,सुनील कांबळे,गोविंद कांबळे,सुनील अशोक कांबळे,सुभाष कांबळे जालिंदर कांबळे,मारुती कांबळे ,चंद्रकांत गायकवाड,विश्वनाथ जोगदंड,महादेवी कांबळे,संगीता कांबळे,वंदना सूर्यवंशी, गौळण कांबळे,विमल कांबळे इत्यादी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डिगंबर गायकवाड यांनी केले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी बस्वराज कांबळे यांच्यासह अनेक युवकांनी परिश्रम घेतले.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..