देवणीत असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश...

देवणीत असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश 

थोड्याच दिवसात अल्पसंख्याक मंञी नवाब मलीक यांच्या नेतृत्वाखाली देवणी शहरात शेकडो दलीत,अल्पसंख्याक,व आठरा पगड जातीतील कार्यकर्ते व नागरीकांचा पक्ष प्रवेश होणार

देवणी / प्रतिनिधी 

देवणी शहरातील  मुस्लीम सामाजातील व इतर समाजबांधवाचे गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असंख्य कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शांंतविर कन्नाडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष पंडीतराव धुमाळ,जेष्ठ नेते इंजि विनायक बगदुरे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डाॕ अनिल इंगोले,राष्टवादी अल्पसंख्याक सेलचे प्रदेश महासचिव प्राचार्य फकरोद्दिन बुदरे,तालुका कार्याध्यक्ष अनिल कांबळे,अमरदिप बोरे,जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव,लक्ष्मण रणदिवे,उल्हास सुर्यवंशी,महेश चव्हाण,दत्ता चाळकापुरे अदि मान्यवरांच्या उपस्थित खालील कार्यकर्त्यांनी शरद पवार साहेबांचे विचार पटल्याने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देवणी शहरासह तालुक्यात बळकट करण्यासाठी पक्ष प्रवेश केले आहेत 
यावेळी मुक्तार भाई तांबोळी,सावरगाचे उपसरपंच पंढरी जोडदापके,ग्राम पंचायत सदस्य काशिनाथ मुंगे,शकिल मनियार,कृष्णा पिंजरे,उंटवाले उबेद,उंटवाले फैजल,उंटवाले तय्यब,शेख मुसा (एम डी) सत्तार खुरेशी,नावदगे शिवकुमार यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केले,
थोड्याच दिवसानंतर नवाब मलीक यांच्या नेतृत्वाखाली देवणी शहरात शेकडो दलीत,अल्पसंख्याक,व आठरा पगड जातीतील सुजान नागरीकांचा पक्ष प्रवेश होणार आहे हे माञ निश्चित 
या कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य फकरोद्दीन बुदरे, यांनी केले होते तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.डाॕ अनिल इंगोले यांनी केले तर सुञसंचलन अमरदिप बोरे यांनि केले आभार प्राचार्य फकरोद्दीन बुदरे यांनी मानले

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..