निलंग्यात बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने उत्साहाने साजरा
निलंग्यात बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा
निलंगा,दि.१०
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस अत्यंत ऊत्साहात साजरा करण्यात आला.
तत्पूर्वी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.
त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.शिवाय दादापीर दर्गा येथे वृक्ष लागवड करण्यात आली.
फळवाटप प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयायाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सौंदाळे साहेब,बालरोगतज्ञ डॉ. साळुंके साहेब ,डॉ टाक साहेब उपजिल्हा रुग्णालयातील फुलसुंदर साहेब ,म्हेत्रे साहेब ,वंचित बहुजन आघडीचे शहर महासचिव विजयकुमार सूर्यवंशी,शहराध्यक्ष शेख आयुब, लातुर जिल्हा उपाध्यक्ष अंकुश कांबळे,तालुका उपाध्यक्ष अंकुश गायकवाड,जितेंद्र कांबळे, दत्ता औंढेकर, आरिफ पठाण साहेबराव कांबळे,बालाजी कांबळे,तात्येराव कांबळे,विद्यवन सुरवसे,महिला जिल्हा महासचिव भारतबाई कदम,बालाजी कांबळे मेकॅनिक,जेष्ठ संपादक मोहन क्षिरसागर, पत्रकार मिलिंद कांबळे, इत्यादी उपस्थित
Comments
Post a Comment