डॉ.मल्लिकार्जुन कुडुंबले यांच निधन
डॉ.मल्लिकार्जुन कुडूंबले यांचे निधन.
निलंगा,दि २४
शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डॉ. मल्लिकार्जुन नागनाथप्पा कुडूंबले यांचे वयाच्या 67 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवार दिनांक 24 मे2022 रोजी पहाटे 2-30 वाजता दुःखद निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर सायं.5-00वाजता निलंगा उदगीर रोडवरील शेतात अंत्यविधी करण्यात येणार आहे. मयत डॉ.एम.एन.कुडूंबले यांच्या पश्चात पत्नी, दोन डॉक्टर मुले, तीन विवाहित मुली, चार भाऊ, दोन विवाहित बहिणी, डॉक्टर सुना, नातवंडे असा परिवार आहे.सन 1978-79 पासून निलंगा येथे त्यांनी दत्त क्लिनिक व मॅटर्निटी होम च्या माध्यमातून वैद्यकीय सेवा दिली. डॉ. एम. एन. कुडूंबले यांनी त्रेचाळीस वर्षाच्या वैद्यकीय सेवेत सुमारे 40 हजार महिलांचे नॉर्मल प्रसुती करण्याचा उच्चांक केला आहे.गरीब व गरजू रुग्णांना परवडणारे डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होती.आरोग्य सेवेबरोबर त्यांचा सामाजिक कार्यात मोठा वाटा होता. त्यांच्या दुःखद निधनामुळे निलंगा शहर व तालुक्यासह जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत असून आज निलंगा येथील अनेक डॉक्टर व व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय बंद ठेवून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केले.
Comments
Post a Comment