वंचित बहुजन आघडी निलंगा नगरपालिका स्वबळावर लढवणार...
वंचित बहुजन आघाडी निलंगा नगरपालिका स्वबळावर लढवणार
निलंगा,दि.०९(मिलिंद कांबळे)
वंचित बहुजन आघाडी आगामी निलंगा नगरपालिका निवडणुक स्वबळावर लढवणार आहे.
पूर्ण ताकदीने नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
‘वंचित’चे लातुर जिल्हाध्यक्ष जगदीश माळी यांनी आज ही माहिती दिली.
येथील वंचित बहुजन आघडीच्या संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.यावेळी राष्ट्रीय ओ.बी.सी युवा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन बोराडे, वंचित बहुजन आघडीच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजुषाताई निंबाळकर,जिल्हा उपाध्यक्ष अंकुश कांबळे,शहर अध्यक्ष शेख आयुब,शहर महासचिव विजयकुमार सूर्यवंशी, संघटक अहमजद कुरेशी,सह संघटक साहेबराव कांबळे,इत्यादीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये कोणासोबतही युती करणार नाही, अशी वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे. सगळ्या जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उतरवले जाणार आहेत.
त्यानुसार प्रत्येक प्रभागात नगरपालिका कार्यक्षेत्रात वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्याला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.अशी माहितीही माळी यांनी दिली.
वंचित बहुजन आघाडी आता आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये स्वबळावर उतरत असल्याने निलंगा शहरातील राजकीय वातावरण तापणार आहे.
भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, यासारखे चार पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असताना वंचितच्या उडीमुळे या निवडणुका बहुरंगी होणार आहेत.
निलंगा, मिलिंद कांबळे
Comments
Post a Comment