धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आंबेडकर पार्कवर विद्युत रोषणाई करण्यात यावी धम्मानंद काळे
धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आंबेडकर पार्कवर विद्युत रोषणाई करण्याची मागणी
निलंगा, दि.०२
होऊ घातलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येथील आंबेडकर पार्कवर विद्युत रोषणाई ,साफसफाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहाराध्यक्ष धम्मानंद काळे यांनी मुख्याधिकारी नगर परिषद निलंगा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, येणाऱ्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाकरिता आंबेडकर पार्क परिसरात विदुत रोषणाई करणे , बुद्धविहारास रंग रंगोटी करणे ,साफसफाई,आसनव्यवस्था आदी मागण्या करण्यात आल्या आहेत
दिलेल्या निवेदनावाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष धम्मानंद काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस श्री सुग्रीव सूर्यवंशी, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष श्री संजय सोनकांबळे, कार्याध्यक्ष श्री धोंडिराम वाघमारे, राष्ट्रवादी सेवादलाचे तालुकाध्यक्ष श्री कुशाबा कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष श्री यशवंत पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment