निलंगा उपजिल्हा रूग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित रुग्णांचे हाल...
येथील उपजिल्हा रुग्णालयात दि.०१ ऑक्टोबर २०२२रोजी सकाळी ०९ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद असल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की,येथील रुग्णालयातील वार्ड क्रमांक ०१ हा वार्ड अत्यावश्यक सेवा असणारा वार्ड असून या वार्डात २४ तास विद्यूत पुरवठा असणे अत्यावश्यक आहे परंतु दि०१ ऑक्टोबर २०२२रोजी येथील या वार्डातील अचानकपणे विद्युत पुरवठा बंद असल्याने व तो सायंकाळी ०६ पर्यन्त सुरू नाही झाल्याने रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
Comments
Post a Comment