निलंग्यातील भाजीपाला सौदा सकाळी सुरू करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा युवा सेनेचा इशारा...

भाजीपाल्याचा सौदा रात्री दोन ऐवजी सकाळी सहा वाजता करावा अन्यथा तीव्र आंदोलन करणार - युवा सेनेचा इशारा.

निलंगा.दि.11

 शहरातील नगरपरिषदेच्या मैदानावर भाजीपाल्याचा सौदा रात्री दोन ऐवजी सकाळी सहा वाजता करावा अशी मागणी युवा सेनेच्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषद निलंगा यांच्याकडे निवेदनाद्वारे  करण्यात आली आहे.

कोरोना काळामध्ये भाजीमंडईतील भाजीपाल्याचा सौदा हा रात्री दोनच्या सुमारास व्यापारी व शेतकऱ्यांनी  ठरवल्याप्रमाणे चालू करण्यात आला होता.पण आता कोरोनाचा काळ संपला असून दिवसभर खेडेगावातील शेतकऱ्यांना शेतातून भाजीपाला काढणे व रात्रीच्या सुमारास दोन वाजता भाजीपाला सौद्यासाठी बाजारात घेऊन येणे अत्यंत त्रासदायक ठरत आहे.

 रात्री अपरात्री साप,डुक्कर, हरिण ई प्राणी यांचा सामना करून शेतकऱ्यांना बाजारात यावे लागते. त्यासाठी मुख्याधिकारी साहेबांनी रात्रीचा भाजीपाल्याचा सौदा हा सकाळी सहा वाजता सुरू करण्याचे आदेश द्यावे, जेणेकरून शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना दिवसा आपला भाजीपाला विकता येईल.
अशी मागणी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर युवा सेनेचे तालुकाप्रमुख प्रशांत वंजारवाडे, रवी नगरसोगे, आयुब शेख, सतीश रुपनर, उद्धव जाधव इत्यादीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..