शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस एस टी महामंडळाच्या वाहकाने कानफटात लगावले. विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण ?
एसटी वाहकाने विद्यार्थ्यास कानफटात.लगावले
औराद शहाजानी (प्रतिनिधी)
संपलेला पास दाखवियाच्या कारणावरून एसटी वाहकाने विद्यार्थ्यांच्या कानफटात लगावले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली.
याची सविस्तर माहिती अशी की, मौजे औराद शहाजानी येथील महाराष्ट्र विद्यालय शाळेमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी सूर्यवंशी सुबोध धोंडीबा हा रा. कलमुगळी , ता.निलंगा येथील रहिवासी असुन तो दररोज सकाळी औराद शहाजानी ते कासार शिरशी या गाडीने येथील शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असतो आणि नंतर संध्याकाळी तीच गाडी परत शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन जाते तसेच दर शनिवारी शाळा ही दुपारपर्यंत असते व त्यानंतर सुटी होते. म्हणून विद्यार्थी हे लातुर ते व्हाया निलंगा औराद ते बस्वकल्याण या गाडीने गावाकडे परत जात असतात या गाडीत शेळगी , ताडमुगळी , कलमुगळी , माळेगाव कल्याणी येथील विद्यार्थी प्रवास करीत असतात व त्यांची दैनंदिन प्रक्रिया असते. आणी यासाठी विद्यार्थ्यांना पासची योजना आहे .तसे ते विद्यार्थी ज्ञानार्जन करण्यासाठी ये-जा करतात.
काल दिनांक ०१ ऑक्टोबर वार शनिवार रोजी सुबोध सूर्यवंशी या विद्यार्थ्यांचा पास संपलेला होता आणि शनिवार असल्यामुळे औराद येथील आगारामध्ये पास देण्यासाठी अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे व तेवढ्यात त्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी गाडी औराद ते बसवकल्याण जाणारी गाडी आल्यामुळे सर्व विद्यार्थी गर्दी करून गाडीत जाऊन बसले अशातच सुबोध सूर्यवंशी ही गाडीमध्ये जाऊन बसला आणि दुपारी अंदाजे दोन तीस वाजता शेळगी ते ताडमुगळीच्या दरम्यानचा प्रवास करीत असताना वाहक एस.जे. कांबळे यांनी या विद्यार्थ्याला पास दाखविण्यासाठी मागणी करताच विद्यार्थी दैनंदिन ये जा करत असलेला पास दाखवला पास संपल्यामुळे सुबोधने तिकीटही काढले तरी परंतु खोटा पास दाखवतो का म्हणुन वाहक कांबळे यानी सुबोध यांच्या कानाखाली मारले मला का मारता अशी विचारणा केल्यावर का विचारतोस पालथ घालुन तुडवतो म्हणत आणी दोन चार हात मारले माझा मुलगा लहान आहे जर तारीख संपलेला दाखवला तरी त्याला पास चालत नाही तीकीट घ्यावे लागल असे समजावुन सांगणे गरजेचे असताना वाहक कांबळे यानी आपल्या कर्तव्याचे न करता अआपल्या पदाचा दुरुपयोग करुन हात उचलणे व नाबालीक मुलास मारहान केली व तीकीटाचे पुर्ण पेसे सुद्दा भरणा करुन घेतले अशी तक्रार पालक धोंडीबा सुर्यवंशी यानी पोलिस स्टेशनला केलेल्या तक्रारीत म्हणले आहे.पालक सुर्यवंशी हे मुलाला घेवुन निलंगा आगारात गेले असता आगार प्रमुख पवार साहेब यानी तक्रार घेतले नाही माझ्या मुलाला त्याच्या वर्ग मिञ मैञीनीसमोर मारहान केली आहे अपमाणीत केले आहे तो स्वताच्या जीवाचे बरेवाईट करुन घेतला तर याला जबाबदार कोन असा सवाल पालक धोंडीबा सुर्यवंशी यानी उपस्थीत केला आहे.
Comments
Post a Comment