मसळगा गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध.माजी आमदार संभाजीराव पाटील-निलंगेकर
मसलगा गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध - माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर
मसलगा येथील विविध विकास कामाच्या लोकार्पण सोहळा च्या निमित्ताने संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी याप्रसंगी मसलगा गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे जमलेल्या ग्रामस्थांना अभिवचन यावेळी दिले.
मसलगा येथे गांधी जयंती निमित 2 ऑक्टोबर रोजी लातूरचे प्रसिद्ध आडत व्यापारी तसेच मसलगा गावचे सुपुत्र दिनकर लक्ष्मणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील सुसज्ज ग्रामपंचायत इमारतीचे व विविध विकास कामांचे माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व सद्गुरु गुरुवर्य गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या शुभ हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी व लाल बहादूर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली
यावेळी बोलताना संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की या गावांमध्ये विविध विकास कामाबरोबर माणसामाणसातील एकोपा तयार करण्याचे काम येथील रमेश पाटील यांनी केले असून हाच विचार जिल्हाभरातील ग्रामपंचायत व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन यावेळी केले व या गावचा सर्वांगीण विकास पहिला तर येथे उभारण्यात आलेली ग्रामपंचायत इमारत ही पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामपंचायती च्या धर्तीवर येथील ग्रामपंचायत इमारत उभी केली आहे.
यावेळी ते म्हणाले की मसलगा गावातील विकास कामांना कसलाहि खंड पडू देणार नाही त्याच बरोबर गुरुबाबाना साक्ष ठेहून गावातील व्यक्तीला रिकाम्या हाताने जावू देणार नाही असे वचन दिले.
नेतृत्व निर्व्यसनी असण हेसुद्धा जनतेचे भाग्यता असते वारकरी संप्रदायामध्ये किर्तन भजन हा एक अविभाज्य अंग असले तरीही त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी निर्व्यसनी राहणे हे कधीही अध्यात्माला बळ देते असे उद्गार गुरु बाबांनी बोलून दाखवले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रमेश पाटील असे म्हणाले की सर्व माणसाचे मन एकत्र रहाणे हाच खरा गावचा सर्वांगीण विकास आहे. असे म्हणत संभाजीराव पाटील यांनी टाकलेल्या विश्वासाचा काम करून त्याचा लेखाजोखा वाचून दाखवला व हे गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे हा सर्व विकास होऊ शकला आपण फक्त निमित्त पात्र आहोत सर्वकाही गावकऱ्यांच्या सहकार्यामुळेच घडू शकले अशी भावनिक उदगार काढले.
या कार्यक्रमाच्या गावातील विविध विकास कामे पाहू गावकऱ्यांच्या आग्रहाखातर सद्गुरु गुरु बाबा व माजी मंत्री निलंगेकर यांनी रमेश पाटील यांचा संयुक्त सत्कार केला
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती जयवंत रावजी जाधव कार्यकारी अभियंता जि प लातूर श्री बाळासाहेब शेलार जी, कार्यकारी अभियंता तसेच गुरुनाथ जाधव, विलास पाटील, बाबासाहेब पाटील, शेषराव पिंड, बालाजी पिंड, अंगद अरेराव, प्रकाश देशमुख, मोहन पिंड, प्रल्हाद लोकरे, बापूराव जाधव, व्यंकट जाधव, आबासाहेब पाटील, श्रीप्रसाद पाटील, सिद्दिक सय्यद, विकास देशमुख, गोपाळ घोडके, अमन सय्यद, विकी जाधव, मंथन धुमाळ तसेच ग्रामसेवक वसंत पोतदार व परिसरातील सरपंच लोकप्रतिनिधी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अब्दुल गालीब शेख तर आभार प्रदर्शन रमेश शिंदे यांनी केले.
Comments
Post a Comment