निराधारांना विनाअट दरमहा पाच हजार रुपये अनुदान देण्याची मागणी...
निराधारांना विनाअट दरमहा पाच हजार रुपये अनुदान देण्याची मागणी
मराठवाडा प्रदेश निराधार संघटना निलंगा शाखेची मागणी
निलंगा,दि.०५
निराधार अपंग अंध विधवा श्रावणबाळ व इंदिरा गांधी भूमिहीन अशा निराधार लाभार्थ्यांना विनाअट तलाठ्याकडून कोणतीही अट न घालता व एक हेक्टरच्या आतील नवीन निराधारांना सुद्धा या योजनेत सहभागी करून घ्यावे अशा मागणीचे एक निवेदन महाराष्ट्र राज्य मुंबईच्या मराठवाडा प्रदेश निलंगा शाखेच्या वतीने या संघटनेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग चिंचोलीकर यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी निलंगा यांच्याकडे देण्यात आले आहे.
निराधार योजनेत एक हेक्टरच्या आतील भूधारकांसह या योजनेतील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सवलतीत वाढ करत अशा गरजूंना दरमहा पाच हजार रुपये मानधन देण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात दोन हेक्टर जमिनीन असणाऱ्या गरजूस 21 हजार रुपये उत्पन्नाचे प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी तलाठ्यां- कडून टाळाटाळ करण्यात येत असते जुन्या नव्या लाभार्थ्यांना सज्ञान मुले आहेत अशी अट घालू नये डीआरडीत नाव असलेले लाभार्थी ते दोन हेक्टर जमीनदार असतील तर त्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा.अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत उपजिल्हाधिकारी निलंगा यांना देण्यात आली या निवेदनावर अपंग जिल्हा अध्यक्ष मधुकर कांबळे यांचे सह अशोक वाडीकर लक्ष्मीबाई जाधव तुकाराम मसलगे सौदागर चिंचोलीकर यांचे सह अनेक मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत
Comments
Post a Comment