निलंग्यात याविविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू ,प्रशासनाचे दुर्लक्ष
विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू
उपोषणाचा दुसरा दिवस प्रशासनाचे दुर्लक्ष
निलंगा, दि०६
निलंगा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंदखेड गावातील नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असलेल्या अक्रम देशमुख या युवकाने विविध मागण्यांसाठी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आमरण $उपोषणाला बसले आहेत.
याबाबत उपविभागीय अधिकारी निलंगा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे खालील मागण्या केल्या आहेत यात प्रामुख्याने निलंगा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षकांनी तथा खाजगी शिक्षण संस्थेतील शिक्षकांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करावे.तसेच शिक्षक ज्या ठिकाणी नोकरी करतात त्याच शाळेत त्यांच्या मुलांनी शिक्षण घेणे सक्तीचे करावे. शिक्षण क्षेत्रातील छुपा आर्थिक भ्रष्टाचार थांबवण्यात यावा शिक्षणाचे बाजरीकरण थांबले पाहिजे.. याकरिता निलंगा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आक्रमभय्या देशमुख सिंदखेडकर हे बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत..
Comments
Post a Comment