विद्यार्थ्यांनो ध्येय व आत्मविश्वास ठेवा यश नक्कीच मिळेल- डॉ.विठ्ठल लहाने
विद्यार्थ्यांनो ध्येय व आत्मविश्वास ठेवा यश नक्कीच मिळेल - डॉ.विठ्ठल लहाने
निलंगा,दि.०२(मिलिंद कांबळे)
विद्यार्थ्यांनी दृढनिश्चय,सातत्य ,कठोर परिश्रम,
आत्मविश्वास व आई वडिलांच्या स्वप्नांशी प्रामाणिकपणा या चार सुत्रीचा संगम केल्यास यश हमखास मिळेल असे प्रतिपादन लातुर येथील प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ.विठ्ठल लहाने यांनी केले.
ते निलंगा येथील श्री कोचिंग क्लासेसच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती हे होते.तर विचारपीठावर प्रचिती कॉम्प्युटरचे सर्वेसर्वा उदय देशपांडे श्री कोचिंग क्लासेसचे संचालक गजेंद्र तरंगे हे होते.
यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, ग्रामिण भागातही गुणवत्ता असते.ती फक्त आपल्याला परिक्षेच्या रिझल्ट मधुन दाखवावी लागते.डॉ तरंगे सरांनी हे यशाचे दालन तयार केल्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थीनी या सुवर्ण संधीचा फायदा घेत आहेत व यापुढेही घेतील अशी अपेक्षा डॉक्टर विठ्ठल लहाने यांनी व्यक्त केले.
विद्यार्थी व पालकांना यशाचा पासवर्ड या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कमिटमेंट कन्सिस्टन्सी कॉन्फिडन्स व कनेक्शन या आधारावर विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये या पासवर्डचा जर अमल केला तर ते भविष्यात यशस्वी होतील व उद्याचे आदर्श नागरिक तयार होतील त्याचबरोबर विद्यार्थ्यांना तसेच पालकांनी एकमेकांशी कसे वागले पाहिजे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment