प्रस्थापितांना धक्का देत रामलिंग मुदगडच्या उपसरपंचपदी युवराज जोगी विराजमान...

प्रस्थापितांना धक्का देत रामलिंग मुदगडच्या उपसरपंच पदी वंचितचे युवराज जोगी विराजमान

निलंगा,दि.०४ 

फुले,शाहू,आंबेडकरी  विचारांचा वारसा जपणारे व त्यांचे विचार प्रत्यक्षात रुजवण्यासाठी नेहमीच अहोरात्र कष्ट घेणारे  वंचित बहुजन आघाडीचे लातुर युवा जिल्हाध्यक्ष  युवराज जोगी यांची  रामलिंग मुदगड या त्यांच्या मूळ गावच्या उपसरपंचपदी निवड करण्यात आली.

मागील वीस वर्षांपासून समाजसेवा करणारे एका सामान्य मेंढपाळ कुटुंबात जन्मास आलेले युवराज जोगी यांनी मागील अनेक वर्षांपासून समाजसेवा करीत मानवता हाच आपला खरा धर्म समजून गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व समाजातील नागरिकांच्या न्यायासाठी,हक्कासाठी तत्पर असणारे युवराज जोगी यांनी आपल्या समाजसेवेचे वृत्त कायम तेवत ठेवले.

याच काळात त्यांची वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब तथा  प्रकाश आंबेडकर यांच्या विचारांचा झंजावत आदर्श डोळ्यासमोर ठेवून बाळासाहेब आंबेडकर यांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून वंचितांसाठीचा  लढा चालू ठेवला.त्यांच्या कार्याची दखल घेऊन बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्यावर वंचितचे लातुर जिल्हाउपाध्यक्ष पद बहाल केले.
या काळातही त्यांनी आपल्या समाजसेवेचे वृत्त सोडले नाही त्यांनी  सामान्य जनतेच्या   विषयांवर त्यांनी मोर्चे आंदोलन रास्तारोको करून अनेक वंचितांच्या विषयांना  न्याय मिळवून दिला.

त्यांनी सुरू ठेवलेल्या या कामाची दखल आद.बाळासाहेब आंबेडकर यांनी गेल्या वर्षभरापासून लातूरच्या युवा जिल्हाध्यक्ष पदाची जवाबदारी सोपवली याची दखल घेऊन ग्रामपंचायत निवडणुकीत रामलिंग मुदगड ग्रामस्थांनी  ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देत ११ जागांपैकी० ६ जागेवर वंचितचा झेंडा फडकावला.

या निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवाराचा निसटता पराभव झाला असला तरी  मंगळवार दि.०४ जाने रोजी झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीत काॅग्रेसचे दोन सदस्य तटस्थ राहिले तर ६ मते घेऊन युवराज जोगी यांच्या गळ्यात उपसरपंच पदाची विजयी माळ पडली. 

यावेळी सरपंच सुकमारबाई कावाले, ग्रा प सदस्य चंदर बुवा, उर्मिला पाटील, ज्ञानेश्वर खोत, जोशील गायकवाड, अन्नपूर्णा मुळजे अदी उपस्थित होते. एका अल्पसंख्याक समाजातील उपसरपंच हि मुदगड गावातील पहीलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.

 या निवडीबद्दल अंकुश मुदगडकर, वजीर शेख, शम्मू शेख, बलभीम गायकवाड, फरीद शेख, अस्लम शेख, दस्तगीर शेख, आयुब शेख, बाबुराव पाटील, शिवलिंग अटीकर, संजय कावाले, सुधाकर पाटील, श्रीमंत होगाडे, मोहन मंगे, राजेश कांबळे, नेताजी कांबळे, प्रभाकर मुळजे, प्रभाकर पाटील, बुध्दीवंत रेड्डी, लहु गोरे, रंजीत दुबे, दत्ता गीरे, नंदू मुळजे, तुकाराम अर्धवाडे, प्रा महेश होगाडे, सदानंद मुळजे, अप्पाराव लंजारे, लक्ष्मण लंजारे, उध्दव तरमुडे,संजय कांबळे, दत्ता कांबळे आदींनी स्वागत केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..