निलंगा तालुक्यातील हालसी (तु) येथील बौद्ध-मातंग वस्त्या प्राथमिक सुविधांपासून वंचित..

निलंगा तालुक्यातील हालसी(तु) येथील बौद्ध-मातंग वस्त्या प्राथमिक सुविधांपासून  वंचित..

प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

नागरिकांचे आरोग्य धोक्यात 

निलंगा,दि.१०(मिलिंद कांबळे)

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटूल गेले तरीही लातुर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मौजे हालसी (तू)  गावातील बौद्ध-मातंग वस्त्या मागील अनेक वर्षांपासून प्राथमिक सुविधेपासून वंचित असून या असुविधेमुळे येथील नागरिकांचा जीव धोक्यात आला असून त्यांना  मरण यातना सहन कराव्या लागत असल्याचे चित्र सद्या येथे पहावयास मिळत आहे.

हालसी (तू) या गावात बौद्ध समाजाचे १०० शंभर कुटुंब असून मातंग समाजाचेही जवळपास १००कुटुंब आहेत.येथील नागरिकांची संख्या हि जवळपास (१०००) एक हजारच्या वर आहे.एवढी मोठी संख्या असूनही येथील नागरिक आजही प्राथमिक सुविधेपासून वंचितच आहेत...

बौद्ध,मातंग वस्त्यांमध्ये मुख्यत्वे पाणीपुरवठा,गटार नाल्या,स्वच्छता,दिवाबत्ती आणि रस्ते ही कामे करण्या- साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामूहिक विकास योजना राबविली जाते.

राज्यातील बौद्ध,मातंग वस्त्यांमध्ये गेल्या २५ वर्षांत विविध सुविधांसाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने कोट्यवधी रक्कम खर्च केली असली तरी सुधारणांची  मात्र येथे बोंब-बोंब दिसत असून लोकप्रतिनिधी, कंत्राटदार यांच्या संगनमतातून या योजनेचा वेळोवेळी बट्ट्याबोळ झाल्याचे समोर येत आहे.या प्रकारांना आळा घालण्यासाठी तत्कालीन  फडणवीस सरकारने दलित वस्त्यांचे जी आय एस मॅपिंग करण्याचा घेतलेला निर्णय अजूनही कागदावरच आहे.

या योजनेत सामाजिक न्याय विभागार्फत दरवर्षी साधारणात: १,२०० ते १,५०० कोटी रुपये खर्च केले जातात. या शिवाय विभागामार्फत विविध जिल्हा नियोजन समित्यांना ३ हजार कोटी रुपये दिले जातात. त्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामूहिक विकास योजनेवर साधारणत: ५०० कोटी रुपये दरवर्षी खर्च केले जातात. तरीही या योजनेचा लाभ या गावाला मिळालाच की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या गावातील पिण्याच्या पाण्याचा बोअर मागील तीन (३) वर्षांपासू बंद असून पाण्याच्या टाकीला ०३ वर्षांपासून पाणीच सोडले जात नसल्याचेही येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

 याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम वाघमारे यांनी ई.सण २०१४ पासून ग्रापंचायत प्रशासन,गटविकास अधिकरी पंचायत समिती निलंगा ,प्रशासनाकडे लेखी मागणी करूनही याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

याबाबत जिल्हाधिकारी लातुर ,मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प लातुर यांनाही दि.१८जानेवारी २०१६ रोजी तक्रारी निवेदन दिले होते. 
मात्र जिल्हाधिकारी लातुर यांनीही  अद्यापपर्यंत दखल घेतलेली नाही. 

एवढेच नव्हे तर या वस्त्यापासून गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम अद्याप झालेले नाही. शिवाय या रस्त्यावर विनायक गणपती हुलसुरे यांचे घर आहे.या घरातील गटाराचे,व सांडपाणी या रस्त्यावर सोडले जात आहे.

यामुळे रहदारीस नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.शिवाय या दोन्ही समाजात सांडपाण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन नाही शिवाय गटार नसल्याने पाणी रस्त्यावर साचलेले असते त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या दोन्ही समाजातील सामाजिक सभागृहाची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. मात्र याबाबीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

याबाबत सामाजिक कार्येकर्ते धोंडीराम वाघमारे व इतर नागरिकांनी २६ सप्टेंबर२०२२रोजी गटविकास अधिकरी पंचायत समिती निलंगा यांना तक्रारी अर्ज दिला होता. याबाबत गटविकास अधिकरी पंचायत समिती निलंगा यांनी  दि ०३ऑक्टोबर २०२२ रोजी ग्रामसेवक ग्रामपंचायत हालसी (तू)यांना पत्र काढुन कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.मात्र हे आदेश हवेतच विरून गेलेले आहेत.या आदेशावर कसल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..