बाबासाहेबांनी दिलेल्या धम्मक्रांतीच्या विचारांचा रथ गतिमान करण्याची गरज -डॉ.भिमराव यशवंतराव आंबेडकर

बाबासाहेबांनी दिलेल्या धम्मक्रांतीच्या विचारांचा रथ गतिमान करण्याची गरज 

    डॉ.भिमराव आंबेडकर

निलंगा, दि०८(मिलिंद कांबळे)

 विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या धम्मक्रांतीच्या विचारांचा रथ  गतिमान करण्यासाठी  सर्वांनी प्रयत्न करावे  असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू  डॉ.भिमराव यशवंतराव आंबेडकर यांनी केले.
ते मौजे किल्लारी ता.औसा जिल्हा लातुर येथील संघमित्रा व तक्षशिला बुद्धविहार किल्लारी येथील पूज्य भंते धम्मसार यांनी आयोजित केलेल्या धम्मपरिषदेत  बोलत होते.

 तत्पूर्वी धम्मपरिषदेचे अध्यक्ष पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते धम्मपरिषदेचे उदघाटन करण्यात आले.यावेळी बीड येथील उपासक प्रशांत वासनिक यांनी तथागत भगवान गौतम बुद्धाची धातूची बुद्ध मूर्ती येथील विहारास दान दिली. तर ठकु युवराज गायकवाड यांनी दगडी पाषाणाची आठ फूट उंचीची तर ईश्वर गायकवाड यांनी अकरा फूट उंचीची बुद्ध मूर्ती दान दिली. तर भंतेगनास औसा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार लालासाहेब कांबळे व प्रतिभा सावळे यांनी चिवरदार दान दिले.

 या धम्मपरिषदेस आलेल्या उपासक,उपसीका यांना सेवानिवृत्त तहसीलदार नागनाथ जाधव यांनी भोजनदान दिले.तर उल्हासनगर महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर  करुणाताई किल्लारीकर यांनी तक्षशिला बुद्ध विहार किल्लारी येथील विहारास साजेसं असं भंते निवास येणाऱ्या बुद्ध जयंती पर्यंत  निर्माण करून देण्याची घोषणा केली. व उपस्थित सर्व भंते गनास धम्मदान दिले.

यावेळी पुज्यनिय भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो ,लातुर येथील पुज्यनिय भदंत पय्यानंद थेरो,बीड येथील पू.भदंत धम्मशील थेरो ,काळेगाव येथील पू.भदंत महाविरो थेरो ,यांनी उपस्थित उपासकांना धम्मदेसना दिली.
 या धम्म परिषदेत खालील प्रमाणे ठराव पारित करण्यात आले १) महाराष्ट्रात हिंदी,संस्कृत विद्यापीठ आहे त्याच धर्तीवर पाली भाषेचे विद्यापीठ विना विलंब स्थापन करावे, २) पाली भाषा जिथे आहे तिथे अनुदान दिले जात नाही त्यास १००% टक्के अनुदान देण्यात यावे ३) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसबे तडवळे येथे २२/२३ फेब्रुवारी१९४१ रोजी आले होते. त्याचे स्मरण म्हणून तेथे भव्य स्मारक उभारण्यात यावे,४) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसबे तडवळे येथे येताना रेल्वेने आले त्याला कळम रोड रेल्वे स्टेशनला  डॉक्टर बी आर आंबेडकर रेल्वे स्टेशन नाव देण्यात यावे,५) तेर ढोकी तालुका उस्मानाबाद आणि तीर्थ बुद्रुक तालुका तुळजापूर येथील उत्खननात बुद्धमूर्ती शिल्प सापडले आहेत म्हणून उत्खनन थांबवण्यात आले आहे ते तात्काळ सुरू करण्यात यावे, ६) डॉक्टर आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीद्वारे त्यांचे लेखन आणि भाषणे हे प्रकाशन थांबले आहे हे प्रकाशन तात्काळ सुरू करावी,७) यूपीएससी एमपीएससी परीक्षेत पूर्वीप्रमाणे पाली भाषेचा समावेश करावा,८) येत्या जनगणनेत आपण धर्म केवळ बौद्ध लिहावे,९) किल्लारी परिसरात जवळपास १०० गावे आहेत हे लक्षात घेऊन किल्लारी गावाला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा हे ठराव या धम्म परिषदेच्या द्वारे पारित करण्यात आले.

 ही धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी किल्लारी गावचे सरपंच युवराज गायकवाड, ईश्वर गायकवाड, प्रकाश कांबळे व इतर उपासक उपासिका यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..