अखिल भारतीय धम्म परिषदेच्या वतीने निलंग्यात सम्राटकार बबनरावजी कांबळे यांना आदरांजली अर्पण..

अखिल भारतीय धम्म परिषदेच्या वतीने निलंग्यात सम्राटकार बबनरावजी कांबळे यांना आदरांजली अर्पण 

निलंगा,दि.१९(मिलिंद कांबळे)

आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपल्या निर्भीड लेखणीच्या माध्यमातून भल्या भल्या-भल्यांना  घाम फोडून वंचित शोषितांना न्याय मिळवून देणारे  दैनिक वृत्तरत्न सम्राटचे संपादक आदरणीय बबनरावजी  कांबळे साहेब यांना निलंग्यात आदरांजली वाहण्यात आली.
तत्पूर्वी सम्राटकार बाबनरावजी कांबळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दोन मिनीट स्तभ उभा राहून आदरांजली वाहण्यात आली.

निलंगा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या अभिवादन सभेस जिल्हापरिषद लातुर चे माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे सर , प्रा.अनंत लांडगे,मोहनराव माने,चंद्रकांत चिकटे,जिल्हाध्यक्ष आर पी आय आय (आठवले )प्राचार्य एस टी मस्के,बालाजी कांबळे माजी समाजकल्याण सभापती,प्राचार्य विजय शृंगारे, देवदत्त बनसोडे,रिपाई (डे) चे प्रदेश सरचिटणीस विलास सूर्यवंशी,कत्तिकार विलास माने, एस के चेले,आर पी आय चे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश ढेरे,भारतीय बौद्ध महासभेचे निलंगा तालुका अध्यक्ष प्रा.रोहित बनसोडे ,गणराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष रामलिंग पटसाळगे, लहुजी शक्तीसेनेचे गोविंद सूर्यवंशी,वंचितचे तालुका अध्यक्ष सुनील सूर्यवंशी,भीम शक्तीचे निलंगा तालुका अध्यक्ष डिगंबर सूर्यवंशी ननंदकर,ककय्या ढोर समाजाचे अर्जुनाअप्पा कटके,राष्ट्रवादी काँग्रेसचे धम्मानंद काळे,ऍड विक्रांत सूर्यवंशी, ऍड धनराज धैर्य,मुरलीभाऊ कांबळे, रमेश सोनकांबळे, संदीप कांबळे, विनोद सूर्यवंशी, देवदत्त सूर्यवंशी, आर एस कांबळे, माधव सूर्यवंशी,दयानंद टाकळीकर,अर्जुन कांबळे, संजय कांबळे, अमोल सोनकांबळे, प्रदीप सोनकांबळे, अमित गायकवाड, माधव सोनवणे,इंद्रजित कांबळे, संतोष कांबळे, करंजीकर सर,वामनदादा कांबळे, सायबा कांबळे, जेष्ठ पत्रकार मोहन क्षिरसागर ,साम्राटचे पत्रकार मिलिंद कांबळे, यांच्यासह अनेक मान्यवर अभिवादन सभेस उपस्थित उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी  मुन्ना सुरवसे यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..