कासारसिरसी परिसरातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा,पिके मान टाकू लागली शेतकरी चिंताग्रस्त
कासार सिरसी परिसरातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत नदी नाले अद्याप कोरडे पिकांनी टाकली मान...
निलंगा, दि.१२(प्रतिनिधी)
कासार सिरसी सह या भागात जून जुलैमध्ये पेरणी लायक भिज पाऊस झाला त्यामुळे खरिपाची उगवण पण उत्तम झाली त्यानंतर मात्र पावसाने ओढ धरल्याने पिकांनी आता माना टाकण्यास सुरुवात केल्याने यंदाचा खरीप हंगाम वाया जाणार असल्याचे चिन्ह आहे...
यंदा परिसरात समाधानकारक पावसावर शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या होत्या जून जुलै नंतर आता पावसाने ओढ धरल्याने पिके हत्ती जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे परिसरात पिकापूरचा पाऊस झाला पण परिसरातील जलाशय व तेरणा नदीचे पात्र मात्र अद्याप कोरडे आहे ऑगस्ट महिना कोरडा जाणार असल्याचे चिन्ह दिसत असून यंदाचा वाया जाणार असल्याचे दिसत आहे त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण असून पाऊस न झाल्यास जनावरांच्या वैरणीसह पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे....
Comments
Post a Comment