कासारसिरसी येथे रस्ता रुंदीकरण कामाचा कार्यकर्त्यांचा हस्ते शुभारंभ...
दहा कोटी रुपये खर्चाच्या रस्ता रुंदीकरण कामाचा पक्ष कार्यकर्त्यांच्या हस्ते कासारसिरसी येथे शुभारंभ..
निलंगा, दि१३(प्रवीण कांबळे)
औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या विशेष निधीतून कासार शिरसी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते ग्रामीण रुग्णालया पर्यंत च्या दोन किलोमीटर अंतर
दोन्ही बाजूस फुटपाथ व गटारासह साठ फूट रुंदीच्या कामाचा शुभारंभ पक्ष कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आला.
कासार शिरशी शहरातील वाढती रहदारी विचारात घेऊन कासार शिरसी ते निलंगा मार्गावरच्या या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे यासाठी तब्बल दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालय या मार्गावरची सर्व अतिक्रमणे काढण्यात येणार असून हा मार्ग प्रशस्त करण्यात येत आहे यामुळे कासार शिरशीच्या सौंदर्यात भर पडणार असून वाहन अपघातास आळा बसणार आहे या स्तुत्य उपक्रमाचे
सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे या देखण्या उपक्रमाचा शुभारंभ कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ज्ञानेश्वर वाकडे, धनराज होळकुंदे, जिलानी बागवान, नितीन पाटील,गोरख होळकुंदे, विठ्ठल गुप्ता, विवेक कोकणे, हैदर मुतरे,बाबू लामजाने, †नाना धुमाळ बालाजी बिराजदार प्रशांत गुंडुरे व श्रीहरी जाधव हजर होते...
Comments
Post a Comment