निराधारांची हेळसांड थांबवा अन्यथा तीव्र जनआंदोलन उभे करू -मुन्ना सुरवसे
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील निराधारांची हेळसांड थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन करू
- मुन्ना सुरवसे
निलंगा/प्रतिनिधी
स्टेट बँक ऑफ इंडिया निलंगा शाखेत निराधारांची होत असलेली हेळसांड तात्काळ थांबविण्यात यावी अन्यथा बँकेच्या विरोधात तीव्र जनआंदोलन उभे करण्याचा इशारा भीम शक्ती संघटनेचे मुन्ना सुरवसे यांनी दिला आहे.
येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत केवायसीसाठी निराधारांची तारांबळ उडत असून एसबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापकाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे चित्र येथे पहावयास मिळत आहे...
याबाबत बधिक माहिती अशी की, निलंगा तालुक्यातील अनेक गावातील निराधार गरीब वृध्द लोकांचे खाते जिजाऊ चौक येथील स्टेट बँक ऑफ निलंगा शाखेत असून येथे हजारो वृध्द गरीब महिला पुरूष यांचे संजय गांधी,श्रावण बाळ विधवा,अपंग,परितक्त्या निराधार मानधन मिळवण्यासाठी तारावरची कसरत करावी लागत असून त्यांचे हाल होत आहेत.सदरील शाखेचे शाखा व्यवस्थापकाचे कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने या वृध्द निराधार आबाल वृध्दांना कर्मचारी आरेरावीची भाषा बोलून हाकलून देत आहेत.अनेक वृध्द महिला पुरूष याना केवायसी काय आहे आणि कसे करावे हे माहिती देखील नाही.आणि बँकेतील कर्मचारी सविस्तर माहिती द्यायला तयार नाहीत त्यामुळे वृध्द महिला पुरूष अक्षरशः तासनतास बँकेच्या दारात रडत बसले आहेत,परंतु बँकेचे कर्मचारी मदत करत नाहीत असा आरोप अनेक वृध्द महिलांनीही यावेळी बोलताना केला आहे.
जगावे का मरावे असा प्रश्न आम्हाला पडला असून आमच्या पाठीपोटी कोणी नाही जे काही निराधार मानधन येते त्यावरच आमचा उदरनिर्वाह आहे.माञ तेही वेळेवर मिळत नाही.गेल्या पाच महिण्यापासून निराधार मानधन मिळाले नसून पाच महिण्यानंतर बँकेत एका महिण्याचे निराधार मानधन जमा झाले आहे.परंतु त्यासाठी शासनाने नविन केवासीचा नियम लागू केल्याने आबाल वृध्द महिला पुरूष यांची मोठी अडचण होत असून त्यांच्या जीवावर आले आहे.अनेक निराधार वृध्द महिला पुरूष निराधार मानधन उचलण्यासाठी २५ ते ३० किलोमीटरहून येत आहेत.
माञ केवायसीचा शासनाने नविन नियम लागू केल्याने शेकडो निराधाराना रीकाम्या हाताने घरी जावे लागत आहेत.
बँकेत केवायसीसाठी टेबलवर वृध्द महिला पुरूष विचारण्यासाठी गेले असता आरेरावीची भाषा त्याना बँक कर्मचारी बोलत आहेत.या संदर्भात शाखा व्यवस्थापक विनोद साखरे यांच्याशी घडलेल्या संपूर्ण प्रकारावर फोनवर चर्चा केली असता तात्काळ कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन केवायसीचे एकून पाच काँऊटर चालू करू असे सांगितले....
Comments
Post a Comment