तानाजी कळकुटे यांच निधन...
तानाजी कळकुटे यांचे निधन...
निलंगा,दि.२०
चित्राच्या माध्यमातून निर्जीव भिंतीमध्ये जीव भरवणारा, अनेक शाळांमध्ये जाऊन बोलके चित्र काढणारा, या धावपळीच्या जीवनामध्ये दोन मिनिट थांबून त्यांची चित्र पाहावे अशी कला साकारणारा मौजे हाडगा ता निलंगा जिल्हा लातुर येथील सामाजिक कार्यकर्ता तानाजी सितांबर कळकुटे यांचं दि.२० ऑगस्ट २०२३ रविवार रोजी पहाटे ०२:३०वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी वयाच्या ३८ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवदेहावर हाडगा येथील स्मशानभूमीत दि.२०ऑगस्ट २०२३ वार रविवार रोजी दुपारी ०२:०० वाजेच्या सुमारास अंतीमसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई,वडील दोन भाऊ,दोन मुले, पत्नी असा मोठा परिवार आहे...
त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे..
जय भीम जय संविधान
ReplyDelete