संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगे-पाटील यांची भेट..
निलंग्यातील संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळानी घेतली जरांगे पाटलांची भेट....
मराठा ओबीसीकरण आरक्षनाची तीव्रता अधिक वाढणार -मानोजदादा जरांगे पाटील
निलंगा/प्रतिनीधी
अंतरवाली सराटी येथे ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी महाराष्ट्र हलवला,जागवला ते मनोज जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी निलंगा तालुक्यातील संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळांनी भेट घेतली व मनोज जरांगे पाटलांना विनंती केले...
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षण/फीस मोफात झाली पाहिजे. कंत्राटी पद्धतीने होत असलेली भरती प्रक्रिया थांबली पाहिजे. शाळा महाविद्यालये, दवाखाने यांचे खाजगीकरण थांबले पाहिजे.
या मागणीचा आग्रह मनोज जरांगे पाटील यांच्या समोर धरला. व संभाजी ब्रिगेड निलंगा, लातुर जिल्हा व यांच्या वतीने पाठिंबा दिला.मनोज जरांगे पाटलांना रोज लाखो लोक येऊन भेटत आहेत प्रत्येकाला बोलणे चालू आहे. संभाजी ब्रिगेडचे निलंगा तालुकाध्यक्ष प्रमोद कदम हे निलंगा येथे झालेल्या आंदोलनाची सविस्तर माहिती दिली व आम्ही तुमच्या सोबत आहोत असा शब्द दिला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे निलंगा तालुकाध्यक्ष प्रमोद कदम, शहराध्यक्ष परमेश्वर बोधले, तालुका सहसचिव कुणाल पाटील, संघटक परमेश्वर नांगरे पाटील, अमोल माने यांच्यासह प्रमूख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment