कासारसिरसी चेअरमन पदी मेलगीरे तर व्हॉईस चेअरमन पदी चिंचनसुरे...
कासार सिरसीच्या चेअरमन पदी मेलगिरे तर व्हाईस चेअरमन पदी चिंचनसुरे यांची बिनविरोध निवड
निलंगा, दि.०८
कासार शिरसी येथील वी का सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी याच सोसायटीचे व्हाईस चेअरमन गुरुनाथ आप्पा मेलगिरे यांची चेअरमन तर संचालकपदी ओम बसवणाप्पा चिंचनसुरे यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीचे फटाक्यांच्या आतिषबाजीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.
कासार शिरसी येथील विकास सेवा सोसायटी चेअरमन पदी गेली 25 वर्षापासून सोसायटी एकसंघ ठेवत कार्य करणारे माजी चेअरमन शिवकुमार गुलाबराव चिंचनसुरे यांची निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने येथील चेअरमन पद रिक्त झाले होते त्या जागी मंगळवार तारीख ७ रोजी या कार्यकारिणीची विशेष बैठकीत निलंगा येथील उपनिबंधक कार्यालयाच्या सौ व्हि डि गणगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली यात सर्वानुमते बिनविरोध चेअरमनपदी गुरुनाथ मिलगिरे तर व्हाईस चेअरमन पदी ओम चिंचनसुरे यांची निवड घोषित करण्यात आली या निमित्त येथील ग्रामपंचायतच्या वतीने उपसरपंच अप्पू चिंचनसुरे ग्रामपंचायती सदस्य बडे साहेब लक्कड हारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
याप्रसंगी जेष्ठ संचालक विठ्ठलराव उजळंबे मधुकर किवडे बंडू सावळकर सेक्रेटरी राजू वेल्हाळ नागेश चिंचनसुरे मदिना लामजने गुलाब धायगुडे अशोक भोसले श्रीमती अक्षरबाई तगरखेडे सौ. कविता बरकंबे यांचे सह ज्येष्ठ नागरिक हुसेन सय्यद मल्लप्पा माळी विजयकुमार व्यवहारे दामू बंडगर नंदू मुळजकर प्रमोद वेल्हाळ ज्ञानेश्वर मडोळे महेश गरंडे आदी मान्यवर हजर होते.
Comments
Post a Comment