निलंगा शहरात अपघातांच्या प्रमाणात वाढ...

निलंगा शहरात अपघातांच्या प्रमाणात वाढ..
रस्त्यावरील अतिक्रमण व मद्यसेवन ठरत आहेत अपघातांचे कारण...
 
निलंगा,दि.२८(प्रतिनीधी)

गेल्या काही दिवसांपासून निलंगा शहर व परिसरात अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.अपघातातील मृतांची संख्या ही पूर्वीपेक्षा वाढल्याने हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. रस्त्यावरील अतिक्रमण, भर रस्त्यात पार्किंग आणि मर्यादित नसलेला वेग व मद्यसेवन करणारे वाहनचालक हे प्रमुख कारण असले तरी यामध्ये केवळ वाहनधारकांची बेशिस्तपणा हे स्पष्टपणे लक्षात येत आहे.
निलंगा शहरातील ननंद रिंगरोड ते उदगीर मोड या रोडवरील निलंगा शहरात दिवसेंदिवस रस्त्यावर वाढत चाललेले अतिक्रमण व सुसाट वेगाने  धावणारे अनेक वाहने व वाहन चालकांच्या बेजबाबदार पणामुळे रस्ता ओलांडताना कंट्रोल न झाल्याने बरेच अपघात घडत असतात. या रस्त्यावर छत्रपती शिवाजी चौक ते कासार सिरसी मोड ते पुढे उदगीर मोड या रस्तावर दोन्ही बाजूने  अनेक छोट्या- मोठया व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून आपले व्यवसाय थाटल्यामुळे  वाहन  चालकांनाही मोठी कसरत करावी लागत आहे.त्यातच निलंगा शहरात  अल्पवयीन मोटार सायकल स्वारांनी  तर शहरात उच्यांक गाठला आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.यामुळे पोलिस प्रशासन नगर पालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. 
एकाच दिवसात दोन  अपघात ,अपघातात दोघांचा मृत्यू...
दिनांक २६ नोव्हेंबर रविवारी रात्री १० च्या नंतर
पहिल्या अपघातात आपले  काम आटोपून घराकडे जात असताना शहरातील  दुचाकीवरील 
नागरिकाला चारचाकी वाहनाने उडवले. त्यामुळे त्याला जखमी अवस्थेत निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . दुसऱ्या अपघातात एका भरधाव वेगात जाणाऱ्या कारने  स्कूटी वरील तरुणीला  उडवले  मागून धडक दिल्याने स्कुटीवरील जखमी  तरुणीवरही  रुग्णालयात उपचार करण्यात आले.दोन्ही अपघातातील रुग्णांना डोक्यात मोठया प्रमाणात जखम झाल्याने लातूरला हलविण्यात आले मात्र दुर्दैवाने यात उपचार चालू असताना  अपघातातील शेषाबाई झटींग कांबळे वय 85 यांचे व दुसऱ्या अपघातातील राजूसिंग टाक वय 38 यांचे सोमवारी सकाळी उपचारादरम्यान लातूर येथील रुग्णालयात निधन झाले.

निलंगा औराद रस्त्यावरील उत्तर बाजूस असलेल्या  ए बी वाईन शॉप हे व असे अनेक  दारू विक्रीचे दुकाने असल्यामुळे मद्यपी लोक दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यात पार्किंग करून दारू पिण्यास जात आहेत व दारू पिऊन त्याच  वाहनावर बसून सुसाट वेगाने जात आहेत.यामुळे वाहतुकीचा बट्टयाबोळ झाला आहे. यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे..

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..