भारतीय संविधान त्यांचेही रक्षण करेल जे पावलो पावली संविधानाचा द्वेष करतात...रामलिंग पटसाळगे
- रामलिंग पटसाळगे
लातूर,दि२६.(मिलिंद कांबळे)
हजारो वर्षापासून मनुस्मृतीच्या जोखडात अडकून पडलेल्या वंचित शोषित पीडित बहुजन समाजासह सर्व भारतीयांना संविधानाच्या माध्यमातून मुक्त करण्याचे महान कार्य भारतीय संवीधाना मुळे झाले आहे. तर ज्या भारतीय सांविधानामुळे मुक्त श्वास घेऊन भारतीय संविधानाचा पावलोपावली अपमान करीत आहेत त्यांचेही रक्षण भारतीय संविधान करीत आहे.असे प्रतिपादन गणराज्य संघाचे युवा नेते तथा लातूर जिल्हाध्यक्ष रामलिंग पटसाळगे यांनी केले.
ते येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क निलंगा येथे आयोजित केलेल्या संविधान दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी ढोर ककय्या समाजाचे ज्येष्ठ नेते अर्जुनअप्पा कटके,ज्येष्ठ पत्रकार मोहन क्षिरसागर,गोविंद कांबळे(व्यापारी)अंकुश कांबळे, माजी नगरसेवक विजयकुमार सूर्यवंशी,माजी नगरसेवक विष्णू ढेरे, मिलिंद कांबळे,बालाजी सूर्यवंशी,नणंदकर,दिगंबर सूर्यवंशी नणंदकर,प्रदीप सोनकांबळे,चंद्रकांत सूर्यवंशी,मुन्ना सुरवसे यांच्यासह अनेक बांधव उपस्थित होते.
यावेळी अनेक मान्यवरांनी संविधान दिनानिमित्त संविधानाचे महत्त्व विषद केले.
यावेळी बोलताना पटसाळगे पुढे म्हणाले की,सामाजिक दर्जाच्या अहांकाराखाली हजारो वर्षाच्या कर्मठ सनातनी विचाराची ठासून भरलेली विकृत शिकवण व या विकृत शिकवणुकीमुळे अनेक समाजाला अन्याय अत्याचार सहन करावा लागला मात्र १९ व्या शतकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमातून सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान देशाला अर्पण केल्यामुळेच या देशातील संविधानाचा सन्मान करणाऱ्या वर्गाचे व संविधानाचा पावलोपावली अपमान करणाऱ्या वर्गाचेही संविधान रक्षण करीत आहे असेही ते यावेळी म्हणाले...
Comments
Post a Comment