कासारसिरसित अतिक्रमणामुळे जलवाहिनीचे काम रखडले...
कासार सिरसी शहरात अतिक्रमणामुळे मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम रखडले शहरात खोदकाम केल्याने काही प्रभागात अद्याप पाणी बंद
कासारसिरसी दि.२९ (श्याम मुळजकर)
कासारसिरसी शहरात शुद्ध पेयजल योजनेचे काम जरी प्रगतीपथावर असले तरी कासारसिरसी निलंगा या मार्गावरील अतिक्रमणाअभावी या योजनेच्या मुख्य जलवाहिनी अंथरण्याचे काम रखडले आहे बांधकाम विभागाने हा मार्ग त्वरित अतिक्रमण मुक्त करून द्यावा अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.
हर घर शुद्ध जल ही दहा कोटी रुपये खर्चाची योजना कासार सिरसी शहरात जरी राबवण्यात येत असली तरी येथील बसस्थानकासमोर रोडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत जागे अभावी या योजनेची मुख्य जलवाहिनी अंथरण्यात अडथळे येत आहेत अतिक्रमणे हटविण्यासाठी वारंवार ग्रामपंचायतच्या वतीने पीडब्ल्यूडी विभागाला अनेक वेळा पत्र लिहूनही ही अतिक्रमणे दूर करण्यात न आल्याने बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत असून ही अतिक्रमणे पोलिसांच्या बंदोबस्तात त्वरित दूर करण्यात यावीत अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे
या योजनेअंतर्गत शहरात नव्याने जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असून काही तांत्रिक चुकांमुळे शहराच्या काही भागात मारुती मंदिराच्या मागे अनेक महिन्यापासून पाणी बंद आहे.
Comments
Post a Comment