आदर्श बसचालक मनोज गुऱ्हाळे यांचा उत्कृष्ट चालक म्हणून सत्कार...
आदर्श बसचालक मनोज गुराळे यांचा उत्कृष्ट चालक म्हणून सत्कार...
निलंगा,दि.२६
मौजे राणी अंकुलगा तालुका शिरूरअनंतपाळ गावचे सुपुत्र मनोज गुराळे हे निलंगा बसडेपोत चालक या पदावर कार्यरत असून त्यांनी विना अपघात वीस वर्षे सेवा केली असून राणी अंकुलग्याची आगळीवेगळी ओळख निर्माण केली असून त्यांनी लहान-मोठयाची उत्तम सेवा केली असून गावोगावी नुसतेच गावोगावी नाही तर निलंगा शहरातही ते अत्यंत लोकप्रिय असून त्यांची गुऱ्हाळे मामा,गुऱ्हाळे साहेब, या ना त्या त्यांना अनेक उपध्या लहान मोठ्याने दिल्या आहेत. त्यांची त्यांनी केलेली ओळख ही त्यांच्या चांगल्या वर्तनामुळे झालेली आहे. प्रवाशांना वयावस्थित सहकार्य करून एसटीची महामंडळाची देखील त्यांनी मान उंचावली आहे. ते प्रत्येक प्रवाश्यांची देखरेख करतात.प्रवाशी,लहान बालक विद्यार्थी बसमध्ये व्यवस्थित चढले आहेत का ?उतरले आहेत का याचीच व व्यवस्थीत दाखल घेऊन लातूर जिल्हा एसटी आगाराच्या वतीने डिझेल बचतमध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आला. त्यानिमित्ताने आदर्श एसटी चालक मनोज ज्ञानोबा गुराळे यांचा आगारप्रमुख बिडवे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
खूपच छान गुराळे साहेब... आपले अभिनंदन
ReplyDelete