निलंगा तालुक्यातील झरी गावानजीक भीषण अपघातात तिघे ठार.
निलंगा तालुक्यातील झरीगावा नजीक -भीषण अपघात, तिघे ठार...
एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू
लातुर ,दि.०१ (मिलिंद कांबळे)
निलंगा,उदगीर राज्यमार्गावर झरीगावा नजीक कंटेनर पलटी होऊन झालेल्या अपघातात तीन (०३) जण जागीच ठार झाल्याची हृदय हेलावून टाकणारी अत्यंत दुर्दैवी दुःखद घटना घडली असून या अपघातात चुलती आणि पुतण्यासह आणखी एका वृद्ध महिलेसह तिघांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, दि.०१ फेब्रूवारी २०२३ रोजी गुरुवारी सकाळी ०६ वाजेच्या सुमारास शेतातून गायी म्हशीचे दूध आणण्या साठी जात असताना हा अपघात झाला.
या अपघातात कृष्णा अर्जुन जाधव वय वर्ष 22 चुलती कस्तुराबाई परमानंद जाधव वय वर्ष 38 रा झरी हे दोघेजण आठ दिवसापूर्वीच नवीन खरेदी केलेल्या मोटरसायकल वरून जात होते.
उदगीर वरून समोरून येणाऱ्या कंटेनर ज्याचा नंबर DD.O1.R.9071 या नंबरच्या कंटेनर ने मोटरसायकलला जोराची धडक मारल्याने अर्जुन जाधव व कस्तुरबाई जाधव हे दोघेही जागीच ठार झाले.तर या गावातील माहेरवाशी असलेली अक्षरा किशन सूर्यवंशी वय वर्ष 65 ही महिला प्रात विधीसाठी जात होती. मोटरसायकल सह या महिलेलाही जोराची धडक लागल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या विचित्र अपघाताने रस्त्यावर रक्ताचा सडा व मासाचे तुकडे पडले होते .तब्बल तीन तास उदगीर निलंगा या मार्गावरची वाहतूक बंद होती. पोलिसांनी दोन क्रेन व एक जेसीबीच्या साह्याने रस्त्यावर आडवे पडलेल्या कंटेनरला बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली कंटेनर व चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनेची माहिती मिळताच निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस व स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु केले.
घटनास्थळावरुन तीनही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले.असून शवविच्छेदनासाठी निलंगा येथील शवगृहात पाठवण्यात आलेले आहेत.
दरम्यान,या राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने सुरक्षिततेबाबत काही चिंता निर्माण झाल्या आहेत. तथापि, सरकारने रस्त्यावरील सुरक्षा सुधारण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे ,या रस्त्यावर पोलिसांची गस्त असणे गरजेचे आहे.
Comments
Post a Comment