बहुजन समाज पार्टी निलंगा विधानसभा अध्यक्षपदी दत्ता भाऊ सूर्यवंशी यांची निवड..
निलंगा,दि.१२
मौजे चिचोंडी ता.निलंगा जिल्हा लातूर येथील रहिवाशी असलेले दत्ताभाऊ विश्वनाथराव सूर्यवंशी यांची बहुजन समाज पार्टीच्या निलंगा विधानसभा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
या निवडीचे पत्र बहुजन समाज पार्टीचे लातूर जिल्हा अध्यक्ष प्रा.डॉ.अनिल एस कांबळे यांच्या हस्ते देण्यात आले असून पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालू ठेवून समाजातील तळागाळातील वंचित शोषित,पीडित व्यक्तींच्या न्याय हक्कासाठी लढून त्यांना न्याय मिळवून देणे व पार्टीचे संघटन वाढवणे यासाठी यांची ही निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल गणराज्य संघाचे रामलिंग पटसाळगे ,भीम शक्तीचे दिगंबर सूर्यवंशी नणंदकर ,आरपीआयचे देविदास धैर्य, ॲड.बालाजी धैर्य, ॲड.धनराज धैर्य, ॲड एन टी धुमाळ, ॲड.मनोज आलमले,सतीश कांबळे,रजीव पाटील,भीमसेन चालवाड,दत्ता म्हेत्रे, अकबर बादशहा ,प्रदीप सोनकांबळे,मुन्ना सुरवसे,प्रवीण कांबळे,अशोक कांबळे शेडोळकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment