ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टरची ट्रॉली आणि मोटारसायकलचा भीषण अपघात दोघांचा मृत्यू
उसाची ट्रॉली आणि मोटार सायकलच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू...
मयत दोघेही निलंगा तालुक्यातील धानोरा येथील रहिवाशी..
लातूर ,दि .२०
मौजे धानोरा ता. निलंगा जिल्हा लातूर या गावानजीक ऊस भरून रस्त्याच्या कडेला उभा केलेली ट्रॅक्टर ट्रॉली व मोटरसायकलचा दि.२० बुधवार रोजी रात्री ०८:०० वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला.
या अपघातात मौजे धानोरा तालुका निलंगा येथील आदिनाथ नेहरू जाधव वय ३७ वर्षे व निखिल दिगंबर काळे वय २५ वर्षे या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
रात्री आठ वाजेच्या सुमारास ऊस भरून ट्रॅक्टर ट्रॉली रोडच्या बाजूला उभी करण्यात आली होती.या उसाच्या ट्रालीचा मोटारसायकल स्वारास अंदाज आला नसल्याने ट्रालीस पाठीमागून जोराची धडक बसली या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले.
उपचारासाठी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता कर्तव्यावर असलेले डॉ. पिनाटे डी. बी. यांनी जखमी दोघांनाही तपासून मृत असल्याचे घोषित केले.
धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक करणाऱ्या व बेजबाबदार रित्या ट्रॅक्टर ट्रॉली उभी केल्याने अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात हंबरडा फोडला...
या अपघातातील मयत आदिनाथ जाधव यांच्या पश्चात आई,पत्नी एक मुलगा वय १३वर्षे एक मुलगी वय १६ वर्षे असा परिवार आहे तर
Comments
Post a Comment