मोटारसायकल अपघातात दोन सख्या भावांचा मृत्यू..
मोटार सायकल अपघातात दोन सख्या भावांचा मृत्यु...
शिरूरआनंतपाळ (प्रशांत तांबोळकर)
मौजे येरोळ ता.शिरूरअनंतपाळ जिल्हा लातूर या गावचे रहिवासी असलेल्या दोन सख्या भावांचा मोटार सायकल आणि कंटेनर अपघातात जागीच मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी दुःखद घटना घडली.
मौजे येरोळ ता.शिरुरआनंतपाळ येथील पवन महालिंग सिंदाळकर वय २८ व सुधीर महालिंग सिंदाळकर वय २५ हे दोघे सख्खे भाऊ नोकरी निमित्त पुणे येथे रहात होते. सुटी असल्याने दोघेही शनीवार दि.३० रोजी रात्री होंडा कंपनीच्या युनीकार्न मोटार सायकलवर गावी निघाले असता पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत चौफुले फाटा रघुनंदन हाॅटेल समोर त्यांच्या मोटार सायकलला कंटेनेरने जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. त्यांच्या पश्चात आई वडील व दोघाच्या पत्नी आहेत. दोघाचेही लग्न दोन वर्षापुर्वीच झाले असुन दोघांनाही मुलबाळ झाले नव्हते. महालिंग सिंदाळकर यांना दोनच मुले होती ते ही आपघातात वारल्याने येरोळ व पंचक्रोशीत सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे. दोघाच्याही प्रेतावर एकाच ठिकाणी त्यांच्या येरोळ येथील शेतीमध्ये रविवारी पाच वाजता अंतिम संस्कार करण्यात आले.
Comments
Post a Comment