जलदान विधी पुण्यानुमोदन...
आयुष्यात काहीतरी पुण्यकर्म करतो म्हणून पुण्यानुमोदन कार्यक्रम करण्यात येतो,काहीजण तो ही करीत नाहीत.पण काही समाज बांधव नंतर सतत तीन वर्ष स्मृतिदिनाचे आयोजन करून जेवण खाण घालतात हे मात्र भावनिक अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखे प्रकार घडवून आणण्याच्या प्रथा वैज्ञानिक सकारात्मक बौद्ध धम्मामध्ये पुन्हा रुढ होऊ लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी जलदान विधी विषयी परखड भाष्य केले होते.तीन वर्ष सतत स्मृतिदिन साजरा करताना कुटुंबपरिवार व इतरांना जेवण देऊन मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला पोहचते अशी भाबडी इच्छा, खरतर आपण १९५६ आधीच्या धर्माच्या रूढी परंपरा जोपासण्याचा विडा तर उचलत नाही.
दुसरा मुद्दा हा की असे केल्याने मृत्यू व्यक्तीचा आत्मा पावन होऊन संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला कोणतीही बाधा होणार नाही अशी देखील भावना अंधश्रद्ध कुटुंबाला भीती स्वरूपात वाटत असते हे मला सतत विचार केल्यानंतर टाळक्यात आले. हां सोडून गेलेल्या व्यक्तींच्या स्मृती आठवणी कायम मनात असतात अर्थात ते येणे अपेक्षित आहेच.पण सतत तीन वर्ष सार्वजनिक स्मृतिदिन साजरा करून जेवण खाण देवून नेमकं काय साध्य करीत,करणार आहोत. भगवान बुद्ध, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा धम्म स्वीकारणाऱ्या बौद्ध समाजाने पुन्हा एकदा चिंतन मनन करायला हवे. खरतर सामाजिक संघटना,कार्यकर्ते,भंते, बौद्धाचार्या यांनी खरतर पूर्णविधी याच्यावर पूर्नवलोकन करायला हवे असं मला वाटते.💐
Comments
Post a Comment