वृक्ष लागवडीने तालुका विधी सेवा शिबिराचे उदघाटन...
वृक्ष लागवडीने तालुका विधी सेवा शिबिराचे उदघाटन ...
निलंगा, दि.१४
निलंगा तालुका विधी सेवा समिती व विधीज्ञ मंडळ निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.3जून जागतिक सायकल दिन, दि.5जून जागतिक पर्यावरण दिन, दि.12 जून जागतिक बालमजुरी विरोधी दिवस, पर्यावरण आणि वृक्षारोपण बाबत जनजागृती मोहीम यानिमित्ताने गुरुवार दि. 13 जून रोजी निलंगा न्यायालयात विधी सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
निलंगा न्यायालयाच्या परिसरात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या हस्ते वृक्षारोपण करून विधी सेवा शिबिराचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस टी भालेराव होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून न्यायाधीश ए.बी. मरलेचा, न्यायाधीश श्रीमती व्हि.डी. भोसले, न्यायाधीश श्रीमती आर.डी. खराटे, न्यायाधीश श्रीमती ए. एस. गुंजवटे, वकील मंडळाचे अध्यक्ष ॲड. बी.जी. हाडोळे, ॲड नारायण सोमवंशी, ॲड एस.व्हि. मठपती, ॲड एस.व्हि.धैर्य आदी उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना न्यायाधीश एस टी भालेराव म्हणाले की, निसर्गाने आपल्या सर्वांना अमूल्य असे योगदान दिले आहे.
त्याचे संरक्षण करणे आपली नैतिक जबादरी आहे. वाढते शहरीकरण पहाता आपण सर्व काँक्रिटीकरण करण्याच्या मागे जात आहोत. ती आजची गरज असली तरीही आपण निसर्गाची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण याच जंगल झाडांच्या सानिध्यात महात्मा गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली तर अनेक संतांनी ज्ञान साधना केली आहे. त्यासाठी आपण एक वृक्ष तोडले तर त्या ठिकाणी नवीन किमान 100 झाडे लावावीत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ॲड. मठपती यांनी कायदेविषयक , ॲड. धैर्य यांनी जागतीक सायकल दिवस याबद्दल तर ॲड.सोमवंशी यांनी पर्यावरण, वृक्षारोपण जनजागृती बद्दल सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड . श्रीमती. व्हि.व्हि. कुलकर्णी यांनी केले. तर आभार ॲड डि.बी. सोळुंके यांनी मानले.
न्यायालयीन कर्मचारी सुजीत चांदोरीकर व वकील मंडळाच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment