निलंग्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा...
निलंगा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा...
निलंगा, दि.१०
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज 25 वं वर्ष पूर्ण केली आहेत. 10 जून 1999 ला काँग्रेस पक्षातून बाहेर पडत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर प्रत्येक वर्धापन दिन पक्षाच्या वतीनं मुंबईसह राज्यभर मोठ्या जल्लोषात आणि धूमधड्याक्यात साजरा केला जातो.
यंदाचं वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचं आहे कारण यंदा पक्षाचा 25 वा वर्धापनदिन सोहळा आहे. परंतु पक्षात आता दोन गट निर्माण झाले आहेत. अजित पवारांना काही कालावधी पुरते राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळालं आहे. तर शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या नावासह तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे दोन्ही गटांसमोर कायदेशीर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हणजेच अजित पवार यांच्यावतीने वर्धापन दिन साजरा आपण जोरदार साजरा करणार असल्याचं म्हंटलं आहे. सध्या पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण जरी न्यायप्रविष्ठ असलं तरी कोर्टाने कोठेही वर्धापन दिन साजरा करण्यासाठी बंदी घातली नसल्याचं अजित पवार गटाचं म्हणणं आहे
अजित पवार गट निलंगामध्ये आपला वर्धापन दिन साजरा केला
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस हसन चाऊस यांच्या हस्ते पक्ष कार्यालयात झेंडावंदन करण्यात आले. या प्रसंगी निलंगा शहराध्यक्ष धम्मानंद काळे,तालुका युवक अध्यक्ष हरिदास साळुंके, राम पाटील, तालुका कार्याध्यक्ष, रियाज सय्यद तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक, संगीताताई कदम शहराध्यक्ष महिला, जिल्हा उपाध्यक्ष विध्यार्थी रोहित पाटील,उद्धव मेकले, संदीप मोरखंडे आदी उपस्थित होते..
Comments
Post a Comment